Pune News : स्नूकर खेळण्यावरून वाद, तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : स्नूकर खेळण्यासाठी स्टीक न दिल्याच्या रागातून  तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. बालेवाडीतील कबाना क्लब लो स्ट्रीटमध्ये रविवारी रात्री हा प्रकार घडला.

याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अभिषेक दिनेश साहू (वय 24) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार मनोज धनकुडे, गणेश आणि आणखी एका वर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अभिषेक साहू हे मित्र कुणाल मलिक यांच्यासह स्नूकर खेळण्यासाठी गेले होते. यावेळी स्नूकर खेळत असताना स्टिक दिली नसल्याच्या रागातून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचा मित्र कुणाल मलिक यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

तर आरोपी मनोज धनकुडे यांनी फिर्यादीच्या छातीवर स्नूकर स्टीकने मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चतु:शृंगी पोलिस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87928eeecb5561b2',t:'MTcxMzkyNDY0My4zNjMwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();