Aries – Annual Horoscope 2020-2021: मेष राशीसाठी यशकारक वर्ष

एमपीसी न्यूज – जाणून घेऊयात मेष राशीचे वार्षिक राशी भविष्य 2020-2021. मेष राशीसाठी हे वर्ष कसे जाईल, याचे भाकित केले आहे नामवंत ज्योतिषी ज्योतिष भास्कर उमेश स्वामी यांनी!  

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

नमस्कार गेली 12 वर्षे आम्ही एमपीसी न्यूजसाठी वार्षिक राशी भविष्य लिहित आहोत. ज्योतिषशास्त्राच्या विविध अंगांचा विचार करून आम्ही वार्षिक राशी भविष्याचे लेखन केले आहे. प्रत्येक ग्रहाचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो व प्रत्येक ग्रहाची गती कमी-जास्त असल्यामुळे आपण जास्त काळ एका राशीत राहणार्‍या ग्रहाचा परिणाम कसा होईल, त्यांचे विवेचन राशी व नक्षत्रानुसार केले आहे.

ग्रहांची मानसिकता शास्त्र व राशीप्रमाणे बदलते. काही ग्रह जगणे नकोसे करणारे वाटतात, परंतु तेथे ग्रह थोड्या कालावधीनंतर आनंद देणारे ठरतात. सर्वसामान्य व्यक्तीचे जीवन हे कुटुंब, मित्र परिवार व नोकरी व्यवसाय यांनी व्यापलेले असते. यात काही शुभ घटना घडल्या की मनुष्य आनंदी होतो. परंतु अप्रिय घटना घडल्यास मनुष्य दु:खी होतो.

आम्ही वार्षिक़ राशी भविष्य लिहिताना प्रमुख अंगांचा जास्त विचार करून लिखाण केले आहे. तसेच उपासना ही या वर्षीच्या ग्रह गोचरीनुसार प्रत्येक राशीस सुचवली आहे. तसेच प्रत्येक राशीला शुभ रंग, भाग्य रत्न, शुभदिनांक व शुभकारक वयवर्षे आम्ही सुचविलेली आहेत. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून निर्णय घेतल्यास आपले कार्य सिद्धीस जाईल, असे वाटते.

– ज्योतिष भास्कर उमेश स्वामी
(ज्योतिष व वास्तू सल्लागार)
केशवनगर, कासारवाडी, पुणे 411034.
मोबाईल – 9922311104.

(राशी  भविष्य पाहताना लग्न राशी, चंद्रराशी व रवि राशी यांचा विचार करावा. लग्न राशीवरून व्यक्तीमत्व विचारात घ्यावे. आरोग्यचा विचार करावा, चंद्र राशीवरून मानसिक सौख्य व रविराशी वरून नोकरी व्यवसाय व सामाजिक यांचा विचार करावा.)

मेष : यशकारक वर्ष राहील

राशी चक्रातील मेषरास ही पहिली रास असून साहसी आत्मविश्‍वास पुरुष स्वभावी रजो गुणांनी परिपूर्ण भरलेली रास आहे. ह्या राशीचे चिन्ह मेंढा हे असून अग्नी तत्वाची रास असून शूर व करारी व्यक्तिमत्वाची गुण आपल्या राशीत आहेत.

प्रत्येक क्षेत्रात तडफदार व आत्मविश्‍वासाने काम करण्याचा आपला स्वभाव आहे. काम करताना आपले उसळणारे तारुण्य ओसंडून जाणारा उत्साह धैर्याने व तेजाने पराक्रम करून आपल्या क्षेत्रात चमकणारी आपली रास आहे.

संकटकाळी न घाबरणारी व शेवटच्या क्षणापर्यंत उत्साह टिकून ठेवणारी आपली क्रियाशीलता, हे गुण प्रकर्षाने जाणवतात. प्रचंड इच्छाशक्ती, मनोग्रह व स्वातंत्र प्रेम असणारी व्यक्ती आपण आहात. ’अशक्य’ हा शब्द आपल्या शब्दकोषात नसतो.

आपल्या व्यक्तिमत्वात अपूर्व ताकद आहे. आपली मते व विचार सदैव गतिमान वेगवान त्वरेने काम करणारे असल्यामुळे नेतृत्वचे काम आपल्याकडे चालून येते. नमते घेणे, माघार घेणे आपणास सहसा जमत नाही.

अपयश जर आलेच तर स्वस्थ बसून राहणार नाही. परत जोमाने कामाला लागता. तर मेष राशीमध्ये अश्‍विनी भरणी व कृतिका ही नक्षत्रे येतात.

मेष रास अश्‍विनी नक्षत्र जातकाची व्यक्तीमत्व व चतुर्थ, सौंदर्य, प्रेमी, धाडसी महत्वाकांक्षी, अधिकारपदाची लालसा असणारी, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणारी सतत नवनवीन गोष्टी शिकणारी, तेजस्वी संशोधक व शास्त्रज्ञ असतात.

भरणी नक्षत्रामधील व्यक्तीमत्व  वाचाळ, भाग्यवादी, भोजनप्रिय, काहीवेळा दृढ निश्‍चयी व कठोर सुंगधी वस्तूची आवड असणारी तर कृतिका नक्षत्रमधील व्यक्तीमत्व तेजस्वी विद्वान चतुर व राजासमान आचरण, स्वाभिमानी गुरु गोष्टीत आवड असणारी चलाख व क्रोधी असते.

तर अशा मेष राशीचे चालू वर्षे कसे राहील ते पाहू…

मेष राशीच्या दशम स्थानातून व लाभातून गुरुचे भ्रमण होत असून तरुणांना नवीन नोकरीच्या संधी प्राप्त होती. नोकरदारांना प्रमोशन मिळेल. राजकीय/सामाजिक क्षेत्रात यश मिळून निवडणुकीत विजय मिळेल. विशिष्ठ उत्तम सहकार्य या वर्षात राहील.

घरातील मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळेल. नवीन वाहन व घर खरेदीसाठी कालखंड उत्तम राहील. समाजात मान/सन्मान/प्रतिष्ठा वाढेल. शिक्षण व अध्यात्म यामध्ये आवड निर्माण होईल. हाताखालील लोकांचे सहकार्य उत्तम राहील.

नोकरीमध्ये बदल, घराजवळ बदली अशा घटना अनुभवास येतील. शत्रूंचा उपद्रव कमी होईल. तर शनिचे भ्रमण हे ही आपल्या दशम स्थानातून होत असून उद्योग व्यवसायात स्थैर्य वाढवणारा काळ राहिल.

नोकरीमध्ये प्रमोशन बढती चांगले बदल येतील. मोठ्या पदाची प्राप्ती होईल. मात्र वरिष्ठ व्यक्तीशी बोलण्यातून ताण तणाव वाढेल. व्यापारात चांगला फायदा होईल. जुनी येणी वसूल होतील. मित्राचे सहकार्य उत्तम मिळेल.

जुन्या घरांचे नूतनीकरण कराल, कोर्टकचेरीच्या कामाता यश मिळेल. वृद्ध व्यक्ती, राजकीय व्यक्ती, वकील यांच्याकडून महत्वाची कामे मार्गी लागतील. तर राहू केतूचे भ्रमण हे धन स्थान व अष्टम स्थानातून होत असून राहू हा अचानक धनलाभ देईल पण कौटुंबिक मतभेदही देईल.

खाण्यापिण्याचे पथ्यपाणी पाळावे लागतील. वडीलोपार्जित प्रॉपर्टी /वारसा हक्क यामध्ये कामात अडथळे डोळ्याचे/दाताचे दुखणे याकाळात संभवते. प्रवास जपून करावे लागतील.

हर्षल आपल्या राशीतून नेप्च्यून आपल्या लाभ स्थानातून व प्ल्यूटो आपल्या नवम व दशम स्थानातून भ्रमण करणार आहे. एकंदरीत सामाजिक जीवनात यश मिळेल. नावलौकिक वाढेल. मोठे प्रवास व व्यवसायात अधिकार मिळेल.

उपासना : गणपती उपासना, मारूती उपासना केल्यास अनुकूल राहील.  त्याचबरोबर रुद्र अभिषेक,  प्रदोष व्रत हे केल्यास उत्तम राहील.

शुभरंग :  लालसर,  गुलाबी, पिवळा, डाळिंबी रंगाचा वापर केल्यास उत्तम राहील.

भाग्यरत्न : पिवळ्या रंगाचा पुष्कराज धारण केल्यास उत्तम राहील.

शुभदिनांक : कोणत्याही महिन्याचा 01, 08, 09, 27.

शुभकारक वर्षे : 12, 15, 21, 30, 48, 58, 62, 69.

Aries – Annual Horoscope 2020-2021: मेष राशीसाठी यशकारक वर्ष

Taurus – Annual Horoscope 2020-2021: वृषभ राशीच्या व्यक्तींची यशाकडे वाटचाल

Gemini – Annual Horoscope 2020-2021: मिथुन राशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत मोठे बदल

Cancer – Annual Horoscope 2020-2021: कर्क राशीच्या व्यक्तींच्या व्यावसायिक प्रगतीचे वर्ष

Leo – Annual Horoscope 2020-2021: सिंह राशीच्या व्यक्तींना शत्रूवर विजय, प्रवासाचा लाभ

Virgo – Annual Horoscope 2020-2021: कन्या राशीच्या व्यक्तींना पदवी- पुरस्कारांचा योग

Libra – Annual Horoscope 2020-2021: तूळ राशीच्या व्यक्तींची जागेची कामे होतील यशस्वी

Scorpio – Annual Horoscope 2020-2021: वृश्‍चिक राशीच्या व्यक्तींना राजकीय-सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठेच्या पदांचा योग

Sagittarius – Annual Horoscope 2020-2021: धनु राशीच्या व्यक्तींना उत्तम धनसंचय व प्रसिद्धीची संधी

Capricorn – Annual Horoscope 2020-2021: मकर राशीच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये सकारात्मक बदल

Aquarius- Annual Horoscope 2020-2021: कुंभ राशीच्या व्यक्तींना यश निश्‍चित, पण संघर्षातूनच!

Pisces – Annual Horoscope 2020-2021: मीन राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती व प्रतिष्ठा वाढवणारे वर्ष

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.