Arjun Award: इशांत शर्मासह 29 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

Arjun Award: 29 players, including Ishant Sharma, recommended for the Arjuna Award 31 वर्षीय इशांत शर्माने भारताकडून आतापर्यंत 97 कसोटी आणि 80 वन-डे सामने खेळले आहेत. इशांतच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 पेक्षा जास्त बळी जमा आहेत.

एमपीसी न्यूज – गोलंदाज इशांत शर्मासह 29 खेळाडूंची यंदाच्या अर्जुन पुरस्कारांसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. क्रीडा मंत्रालयाच्या समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब केलं आहे.

इशांत शर्मासह या यादीत तिरंदाज अतानु दास, महिला हॉकीपटू दिपिका ठाकूर, कबड्डीपटू दिपक हुडा, टेनिसपटू दिवीज शरण या खेळाडूंच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

31 वर्षीय इशांत शर्माने भारताकडून आतापर्यंत 97 कसोटी आणि 80 वन-डे सामने खेळले आहेत. इशांतच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 पेक्षा जास्त बळी जमा आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, महिला टेबलटेनिसपटू मनिका बत्रा आणि पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू यांच्या नावांची राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.