Arjun Kapoor covid positive: अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण

माझ्या तब्येतीविषयीचे अपडेट्स मी तुम्हाला सोशल मीडियाद्वारे देत राहीन. या महामारीच्या काळात आपण सर्वजण मिळून या कोरोना विषाणूशी यशस्वी लढा देऊ अशी मला आशा आहे', असे अर्जुनने म्हटले आहे.

एमपीसी न्यूज – दिवसेंदिवस कोरोनाचे संकट आणखीनच वाढत आहे. आता भारत हा कोरोना रुग्ण असलेला अमेरिकेपाठोपाठ दुसरा देश ठरला आहे. मात्र हा कोरोनाचा विषाणू लागण होण्यासाठी कोणतेही बंधन ठेवत नाही. तुम्ही गरीब असा किंवा श्रीमंत असा, सामान्य असा किंवा सेलिब्रेटी असा त्याने कोणालाच सोडलेले नाही. आत्तापर्यंत अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे.

आता अभिनेता अर्जुन कपूरने देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित तो कोरोना पॉझिटीव्ह झाल्याची माहिती दिली. अर्जुनला कोणतीच लक्षणे नसून सध्या त्याला घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग तो अभिनेत्री नीना गुप्ता व रकुल प्रीत सिंह यांच्यासोबत फिल्म सिटीमध्ये करत होता. अर्जुनला कोरोनाची लागण होताच या चित्रपटाची शूटिंग थांबवण्यात आले आहे.

दोन-तीन दिवसांपूर्वीच अर्जुनने शूटिंगला सुरुवात केल्याची माहिती दिली होती. इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याने फोटो पोस्ट केले होते. मात्र आता त्याला कोरोनाची लागण झाल्याने शूटिंग बंद करण्यात आले असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

View this post on Instagram

🙏🏽

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on


‘मला कोरोनाची लागण झाली असून ही माहिती तुम्हा सर्वांना देणे हे माझं कर्तव्य आहे. मला कोणतीच लक्षणे नसून मी ठीक आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी घरीच स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं असून पुढील काही दिवस क्वारंटाइनमध्येच राहीन.

माझ्या तब्येतीविषयीचे अपडेट्स मी तुम्हाला सोशल मीडियाद्वारे देत राहीन. या महामारीच्या काळात आपण सर्वजण मिळून या कोरोना विषाणूशी यशस्वी लढा देऊ अशी मला आशा आहे’, असे अर्जुनने म्हटले आहे.

अभिनेता अर्जुन कपूरला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्याची प्रेयसी व अभिनेत्री मलायका अरोरा हिलासुद्धा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. मलायकाची बहीण अमृता अरोरा हिने याबद्दलची माहिती ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.