Arjun Tendulkar : सचिनचा मुलगा असला तरी अर्जुन तेंडुलकरला गुणवत्ता सिद्ध करावीच लागेल – आकाश चोप्रा

Despite being Sachin's son, Arjun Tendulkar will have to prove his worth - Akash Chopra अर्जुनने सरस कामगिरी केली तरच त्याला मोठ्या स्तरावरील क्रिकेट खेळता येईल. सचिन त्याच्या नावासाठी कधीही आग्रह धरणार नाही

एमपीसी न्यूज – सचिन तेंडुलकरचा मुलगा असला तरीही अर्जुन तेंडुलकरला त्याची गुणवत्ता सिद्ध करावीच लागेल तरच मोठ्या स्तरावरील क्रिकेट खेळता येइल. अशा शब्दात माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्राने क्रिकेटमध्ये नेपोटिझम नसल्याचे सांगितले आहे.

_MPC_DIR_MPU_II

नेपोटिझमचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर परिणाम झाला आहे का, या प्रश्नावर चोप्राने आपले मत मांडले आहे. चोप्रा म्हणाले, जगभरात अनेक क्रिकेटपटू असे आहेत की, ज्यांची मुलेदेखील क्रिकेट खेळले आहेत. मात्र, त्यांना वडिलांच्या कामगिरीचा लाभ झाला नाही. तसेच या खेळाडूंनी कधीही आपल्या नावाचा वापर आपल्या मुलासाठी केला नाही. जगभरात अशी अनेक उदाहरणे आहेत.

विक्रमादित्य सुनील गावसकर, रॉजर बिन्नी ही तर भारतातील उदाहरणे पाहिली तर क्रिकेटमध्ये नेपोटिझम नाही हे सगळेच मान्य करतील. या दिग्गज खेळाडूंची मुलेही क्रिकेटपटू बनली मात्र, त्यांनी त्या दर्जाची कामगिरी केली नाही व त्यामुळेच आज त्यांना भारतीय संघातील स्थान गमवावे लागले. अर्जुनने सरस कामगिरी केली तरच त्याला मोठ्या स्तरावरील क्रिकेट खेळता येईल. सचिन त्याच्या नावासाठी कधीही आग्रह धरणार नाही, असेही चोप्रा यांनी सांगितले.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बाॅलिवूड सहित क्रिकेट मधील नेपोटीझम वर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला सुद्धा काही दिवसांपूर्वी नेपोटीझम वरून लोकांनी ट्रोल केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.