Talegaon Dabhade : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात मुक्कामाच्या ठिकाणी एक हजार शौचालयांची व्यवस्था

एमपीसी न्यूज – जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे 10 जून रोजी प्रस्थान होणार आहे. पालखीच्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी निर्मल वारीच्या माध्यमातून एक हजार शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती संयोजक संतोष दाभाडे (Talegaon Dabhade)  पाटील यांनी दिली.

वारक-यांना वारीच्या दरम्यान शौचालयाची व्यवस्था व्हावी, मुक्कामाच्या गावात दुर्गंधी पसरू नये, साथीचे आजार, रोगराई पसरू नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने सदर निर्मलवारीचा उपक्रम गेली अनेक वर्षापासून राबविला जात आहे.
यावर्षी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी एक हजार शौचालय तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी एक हजार 500 शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. देहू नगरपंचायत, देवस्थानचे विश्वस्त, निर्मल वारीचे कार्यकर्ते व कॉन्ट्रॅक्टर अशी नुकतीच बैठक झाली. यामध्ये देहु येथे 15 ठीकाणी एक हजार शौचालय लावण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे पाणी, लाईट यांचे नियोजन देखील पुर्ण झाले असल्याची माहिती दाभाडे (Talegaon Dabhade) यांनी दिली.
https://youtu.be/otr2YLxyRao

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.