Talegaon Dabhade : तळेगाव स्टेशन येथे भाजीपाला व्यवसायिकांसाठी शेडची व्यवस्था

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौक ते स्टेशन रस्त्याच्या दुतर्फा बसणाऱ्या व्यवसायिकांना आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव स्टेशन येथे मोठ्या शेडची व्यवस्था करून व्यवसाय करण्याची संधी दिल्याबद्दल नागरिकांनी तसेच व्यवसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मागील वर्षापासून आलेल्या कोरोना संक्रमणाच्या संकटामुळे अनेकांना आपली नोकरी व लहानसान व्यवसाय गमवावे लागले. बऱ्याच नागरिकांनी रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला, फळे विक्रीचा व अन्य लहानसान व्यवसाय सुरू केले.त्यामुळे त्यांची रोजीरोटी भागत होती. परंतु या रस्त्याच्या कडेला हे व्यवसाय सुरू केले होते. ते अनधिकृतपणे होते. त्यामुळे नगरपरिषदेच्या अनधिकृत  अतिक्रमणाच्या कारवाईस  वेळोवेळी त्या व्यवसायिकांना  सामोरे जावे लागत होते. तसेच यामध्ये  त्या व्यावसायिकांचे फार मोठे नुकसान  होत होते.

लॉकडाऊनच्या काळामध्ये शासनाने दिलेल्या वेळेमध्ये हे व्यावसायिक व्यवसाय करत असल्याने रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत होती. त्यामुळे या प्रमुख रस्त्यावरून जाताना येताना गाडी चालकाला अत्यंत सावधानतेने गाडी चालवावी लागत होती.

या रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना कायमस्वरूपी जागा मिळावी तसेच रस्त्यामध्ये वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव स्टेशन येथे मोठे शेड उभारून या ठिकाणी या व्यावसायिकांची व्यवसाय करण्याची व्यवस्था केली. तसेच या जागांमध्ये पुढील बाजूस खरेदी करण्यास येणाऱ्या नागरिकांना पार्किंगची व्यवस्था देखील केली त्यामुळे रस्त्यावरती कोणत्याही प्रकारचा अडथळा राहिला नाही या घटनेचे नागरिक व व्यवसायिक का कडून  स्वागत करण्यात येत असून  नागरिक समाधान व्यक्त करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.