Crime News : कत्तलीसाठी जनावराची वाहतूक करणाऱ्याला अटक

 एमपीसी न्यूज – गायीच्या वासराला कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या एकास देहूरोड पोलिसांनी अटक केली.ही कारवाई शनिवारी (दि. 6) रात्री मामुर्डी – देहूरोड मार्गावर करण्यात आली.

जावेद छोटूमिया शेख (वय 53, रा. देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई किशोर बोंडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या टेम्पोतून एक वर्ष वयाचे गायीचे वासरू कत्तलीसाठी नेले.आरोपीकडे याबाबत कोणताही परवाना नसताना त्याने हे कृत्य केले.कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर देहूरोड पोलिसांनी कारवाई करून आरोपीस अटक केली. त्याने टेम्पोमध्ये वासराला चारा, पाण्याची व्यवस्था केली नव्हती, तसेच जनावराला वाहनामध्ये पोषक व्यवस्था केली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.