Pune – ऑनलाइन तिकीटे देण्याच्या बहाण्याने लुबाडणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – टुकान ट्रॅव्हल्स नावाची बनावट ट्रॅव्हल कंपनी बनवून सवलतिच्या दरात विमानाची ऑनलाइन तिकीटे देण्याच्या बहाण्याने लुबाडणा-या दोघांना मार्केटयार्ड पोलिसांनी राजस्थान मधून अटक केली आहे.

कमल उर्फ पार्थवी चंदेल(वय 30, रा. जयपूर) व अमित सिंह (वय 32, रा. उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कमल व अमित दोघांनी मिळून टुकान ट्रॅव्हल्स नावाची बनावट ट्रॅव्हल कंपनी बनवून जस्ट डाइल आणि सुलेखा सारख्या प्रसिद्ध वेबसाईटवर कंपनीचा बनावट पत्ता टाकून कंपनीची माहिती टाकली होती. ट्रॅव्हल कंपनीकडून सवलतीच्या दरात विमान तिकिटे ऑनलाइन बुकिंग होत असल्याची माहिती वेबसाईटवर देण्यात आली होती. तसेच साऊथ इंडियन बँकेमध्ये बनावट माहिती देऊन कंपनीमध्ये खाते उघडले होते.

मुंबई येथील फिर्यादी सुषमा शर्मा यांनी आरोपींशी संपर्क साधून त्याला संफ्रान्सिस्को येथे जाण्यासाठी दोन एअर इंडियाची तिकिटे पाहिजे असल्याचे सांगितले आरोपीनी फिर्यादीच्या व्हाट्सएपवर त्या दोन तिकिटांचे बुकिंग पाठवल्याचे भासवून त्यांना एकूण 3 लाख50 हजार रुपये त्यांनी बनवलेल्या साऊथ इंडियन बँकेच्या खात्यात जमा करण्यास सांगितले. पैसे भरल्यानंतर अर्ध्या तासाने कन्फर्म तिकीटे पाठवतो असे सांगून व तसा मेसेज फिर्यादिच्या इमेल आयडीवर टाकला.

फिर्यादी यांना परदेशी जाणे अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांनी आरोपीना वारांवर संपर्क साधुन देखील त्यांनी त्यांना तिकीटे मिळाली नाहीत त्यामुळे फिर्यादी ने गुन्हा दाखल केला पोलिसांनी दाखल गुन्ह्याची कसून तपासणी केली असता ती ट्रॅव्हल कंपनी बनावट असल्याचे समोर आले. मार्केटयार्ड पोलिसांनी तांत्रिक तपास करून राजस्थान येथून गुन्हेगारांना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.