Pune : पैशांसाठी व्यावसायिकाचा खून करणारे गजाआड

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील वाडा विकसित करणाऱ्या व्यावसायिकाचा खून करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना भोर येथील शिळीम गावाच्या परिसरात 12 जानेवारीला घडली होती. महेंद्र शांताराम बोडके (रा. धनकवडी) आणि अजय प्रदीप बारमुख (रा. इंदिरा नगर, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

रिकबचंद रायचंद ओसवाल (वय 70,रा. शांतीनगर सोसायटी महात्मा फुले पेठ) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, 13 जानेवारी 2019 येथील गावाच्या परिसरात एका अनोळखी व्यक्तीचे मिळाले होते. दोरीने तसेच रुमालाने बांधून मृतदेह झाडाझुडपांमध्ये फेकून देण्यात आला होता. मृतदेहाची ओळख पटवली असता तो मृतदेह पुण्यातील ओसवाल या व्यावसायिकाचा असल्याचे उघडकीस आले.

त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींचा तपास करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तपास करून संशयित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडे कसून विचारपूस केली असता आरोपींनी व्यवसायिकाकडे पैशांची मागणी केली होती आणि ते पैसे (मृत) ओसवाल हे देत नसल्यामुळे त्यांनी ओसवाल यांचा खून करून तो मृतदेह रानटी झाडाझुडपांमध्ये फेकून दिल्याचे कबूल केले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे,दिलीप जाधवर,दयानंद लिमण,चंद्रकांत झेंडे,जगदीश शिरसाठ, राजु चंदनशिव,शंकर जम, मोरेश्वर इनामदार,मुकुंद आयाचित, सचिन गायकवाड, विशाल साळुंखे, बाळासाहेब खडके, अक्षय नवले यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.