Lonavala : शहर व ग्रामीण भागात चोर्‍या करणार्‍या अट्टल घरफोड्यास अटक

0

एमपीसी न्यूज – लोणावळा शहर व ग्रामीण भागात बंद बंगले व घरे फोडून चोर्‍या करणार्‍या अट्टल घरफोड्याला लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून चोरी केलेला 1 लाख 98 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सूरज उर्फ सोनू उर्फ अब्बास उर्फ रफिक सुभाष विश्वकर्मा (वय 34, मुसलमाननगर, पनवेल, जि. रायगड. मूळचा राहणार वाराणसी कँम्प, उत्तरप्रदेश), असे या अट्टल घरफोड्याचे नाव आहे. त्याच्यावर मुंबई भागात चोर्‍या, घरफोड्या, जबरी चोरीचे काही गुन्हे दाखल आहेत.

लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सामिल प्रकाश, पोलीस नाईक वैभव सुरवसे, अजिज मेस्त्री, मनोज मोरे, राजेंद्र मदने, पवन कराड हे शुक्रवारच्या आठवडे बाजारात पेट्रोलिंग करत असताना त्याठिकाणी एक व्यक्ती रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी उभा राहून बाजारात येणार्‍या नागरिकांना भेटून आपको सेकंड हॅन्ड एलसीडी टिव्ही खरीदना हैं क्या? मेरे पास टिव्ही है ! असे विचारत आहे, अशी माहिती मिळाल्याने गुन्हे पथकाने सदर व्यक्तीची साध्या वेशात जाऊन चौकशी केली. मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात विचारपूस केली असता, त्यांने चार महिन्यापूर्वी लक्ष्मीनगर सोसायटी, तुंगार्ली येथील बंगल्यात चोरी करुन एलसीडी टिव्ही व काॅपी मेकर पळविले असल्याची कबूली दिली.

सखोल चौकशी केली असता त्याच्याकडे विविध ठिकाणी घरफोड्या करुन चोरलेले सहा एलसीडी टिव्ही व एक काॅपी मेकर मिळून आले आहे. लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रफिक याने घरफोड्या केल्या आहेत. मुंबईमध्ये देखिल त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीसांनी दिली. याप्रकरणाचा अधिक तपास लोणावळा शहर स्थानिक गुन्हे प्रकटीकरण विभाग करत आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like