Chakan Crime News : दुचाकीच्या डिकीतून गांजा घेऊन जाणा-यास अटक 

एमपीसी न्यूज – दुचाकीच्या डिकीतून गांजा घेऊन जाणा-यास चाकण पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (दि.26) रात्री आठच्या सुमारास मेदनकरवाडी याठिकाणी हि कारवाई करण्यात आली. 

तापस रंजन गिरी (वय 32, रा. मेदनकरवाडी, चाकण, मुळ रा. गडसाही बर्यापूर, ओडिसा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय दीपक जगदाळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तापस गिरी याने एम एच 14 जी डब्लू 4751 या दुचाकीच्या डिकीतून 50 हजार किंमतीचा दोन किलो गांजा जवळ बाळगला होता. विक्री करण्याच्या उद्देशाने आरोपीने गांजा जवळ बाळगल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दुचाकी व गांजासह एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.