सायबर फ्रॉड : मार्क वाढवून देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज- एमबीएची प्रवेश परिक्षा एका ऍप्लिकेशनव्दारे प्रवेश परिक्षेसंबंधीत वेबसाईटचा ऍक्‍सेस स्वत:कडे घेऊन गुण वाढवत फसवणूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अभय मिश्रा (रा. मानगो, जमशेदपूर, झारखंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून 1 लॅपटॉप, 1 मोबाईल संच, 4 पेनड्राईव्ह, 4 डेबीट कार्ड व इतर साहित्य जप्त केले आहे.

फिर्यादी यांना परदेशात एमबीए करणेकरिता प्रवेश घ्यावयाचा होता. त्यासाठी सोशल नेटवर्किंग साईटवर जीमॅट या एमबीए पूर्व परिक्षेबाबत सर्च केले असता त्यांना GMAT_GRE_SHORTCUT ही इन्स्टाग्राम प्रोफाईल दिसून आली. त्यात प्रवेशाकरिता असणाऱ्या जीमॅट या पूर्व परिक्षेमध्ये 100 टक्के चांगल्या गुणांची हमी देण्यात आली होती. त्यानुसार फिर्यादी यांनी सदर इन्टाग्राम प्रोफाईलच्या माध्यमातून प्रोफाईल धारकाशी संपर्क साधून सर्व प्रक्रिया पूर्ण केली.

त्यानुसार 750 पेक्षा अधिक गुणांकरिता 4 लाख, 740 पेक्षा अधिक गुणांकरिता 3 लाख 70 हजार, 730 पेक्षा अधिक गुणांकरिता 3 लाख 50 हजार, 720 पेक्षा अधिक गुणांकरिता 3 लाख, 710 पेक्षा अधिक गुणांकरिता 2 लाख सत्तर हजार आणि 700 पेक्षा अधिक गुणांकरिता 2 लाख 50 हजार असे रेट असल्याचे आरोपींनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी संपर्क साधला. त्यांना 4 लाख रुपये मागण्यात आले. पंरतु त्यांनी पैसे देण्यास नकार देत पोलिसांकडे तक्रार केली होती. याबाबत सायबर पोलीस तपास करत असताना आरोपी हा झारखंड येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलिसांनी पकडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.