Talegaon Crime News : बेकायदेशीर गांजा बाळगणा-यास अटक  

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे गांजा जवळ बाळगणा-यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून 842 ग्रॅम वजनाचा गांजा व रोख रक्कम 2900 रुपये जप्त करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.07) नवलाख उंब्रे येथे ही कारवाई केली.

समाधान चिमाजी चव्हाण (वय 35, रा. नवलाख उंब्रे, ता. मावळ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटक आरोपीवर तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीसी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीने बेकायदेशीरपणे 842 ग्रॅम वजनाचा गांजा जवळ बाळगला होता. अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेऊन 842 ग्रॅम वजनाचा गांजा व रोख रक्कम 2900 रुपये जप्त करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.