मंगळवार, डिसेंबर 6, 2022

तरुणीचा विनयभंग करत आत्महत्येची धमकी देणारा अटकेत

एमपीसी न्यूज –  तरूणीला तू मला आवडतेस, तू नकार दिला तर मी माझा जीव देईन म्हणत तरूणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला चाकण पोलिसांनी अटक केले आहे.

पीडित तरूणीने दिलेल्या फिर्यादीवरून सुहास गोविंद दोरे (वय 23 रा. तळवडे) याला पोलिसांनी अटक केली आहे.

Ajit Pawar : राजकीय गदारोळात महागाई, बेरोजगारीकडे होतेय दुर्लक्ष – अजित पवार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या शेतात जात असताना आरोपी पाठीमागून आला  व त्याने आरोपीला एकटे पाहून फिर्यादीच्या गळ्यात हात घालून तू मला आवडतेस , तू मला हो बोलली नाही तर मी माझा हात कापून घेईन व माझा जीव देऊन अशी धमकी देऊन महिलेचा विनयभंग केला यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

Latest news
Related news