बुधवार, फेब्रुवारी 8, 2023

Molestation Case: मामी-भाचीचा पाठलाग करून विनयभंग करणारा अटकेत

एमपीसी न्यूज – अल्पवयीन भाची व मामीचा पाठलाग करून त्यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार जून 2022 पासून विकासनगर ते कासारवाडी येथे घडत होता.

याप्रकरणी 17 वर्षीय मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून इमाम खाजा पटेल (वय 49 रा. कासारवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

विद्यापीठाच्या तदर्थ अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ अजयकुमार राय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व तिच्या मामी (वय23) यांचा आरोपी पाठलग करत असे व त्यांच्याशी गैरवर्तन करत असे. हा प्रकार जून 2022 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत घडला.त्याच्या या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांनी अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्या विरोधात तक्रार दिली. यावरून भोसरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर विनयभंगाचा तसेच बाल लैंगीक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्ग गुन्हा दाखल केला आहे.

Latest news
Related news