Dehuroad : बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी बुधवारी (दि. 13) बीआरटी बस स्टॉप किवळे येथे केली. दोघांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक देशी बनावटीचा कट्टा आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

कुश नंदकुमार पवार (वय 29), ऋषिकेश विलास दाभाडे (वय 22, रा. तळेगाव दाभाडे), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस नाईक दत्तात्रय बनसोडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील बीआरटी बस स्टॉप जवळ दोन तरुण संशयितरित्या थांबले असून त्यांच्याकडे पिस्तूल आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून कुश आणि ऋषिकेश या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दोघांकडे 73 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल, एक देशी बनावटीचा कट्टा व तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी हा ऐवज जप्त करत दोघांना अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोमारे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like