Pune News : पिस्तूलाच्या धाकाने व्यापाऱ्याला लुबाडणारे जेरबंद,

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : एका व्यापाऱ्याच्या पोटाला पिस्तूल लावून 44 हजार रुपये अज्ञात चोरट्याने लुबाडून नेले होते. केशवनगर मुंढवा येथील गणेश टिंबर मार्केट मध्ये ही घटना घडली होती. मुंढवा पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. हे दोघेही जामिनावर सुटून नुकतेच बाहेर आले होते. त्यांच्या ताब्यातून एक पिस्तुल, पाच जिवंत काडतुसे, रोख 17 हजार आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली.  प्रवीण उर्फ दादा सतीश पवार (वय 36) आणि संदीप उर्फ राम बापू वाघ (31) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत जलाराम प्रभुजी प्रजापती (वय 45) यांनी फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी यांचा केशव नगर मध्ये गणेश टिंबर मार्केट या नावाने व्यवसाय आहे. शुक्रवारी दुपारी ते दुकानात एकटाच असताना दोन व्यक्ती अचानक दुकानात शिरले आणि त्यांनी तुम्हारे पास वीस लाख रुपये आये है असे म्हणत त्यांना पिस्तूल दाखवले. तर दुसऱ्या साथीदाराने गल्ल्यात पैसे आहेत का हे पाहताना जमा झालेले 44 हजार रुपये काढून घेतले.

पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला असताना वरील आरोपींनी हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना समजली होती. त्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवून प्रवीण पवार याला अटक केली. पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजल्यानंतर दुसरा आरोपी संदीप वाघ हा हा फरार झाला होता. मोबाइल बंद करून तो पाचगणी येथील भोसे गावात जाऊन लपला होता. परंतु त्याच्या हालचालीवरून पोलिसांनी भोसगाव जाऊन त्याला अटक केली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.