Hinjawadi : कार चालकाशी हुज्जत घालून सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – मोटारीमधून जाणा-याला अडवून त्याच्याशी हुज्जत घालत त्याची 50 हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरणा-या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री हिंजवडी फेज तीन येथे घडली.

अक्षय गणेश कंदारे (वय 23), निखिल गणेश कंधारे (वय 21, दोघे रा. चांदे लवळे, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विक्रांत विनायक नलावडे (वय 40, रा. हिंजवडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विक्रांत हे त्यांच्या कारमधून (एम एच 46 / ए पी 9077) त्यांच्या घराकडे जात होते. दोन आरोपींनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग करत त्यांना अडवले. त्यानंतर ‘तू माझ्या अंगावर पाणी उडवलेस काय’ असे म्हणत त्यांच्या डोक्यामध्ये प्लास्टिकचा पाइप मारून जखमी केले. त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी चोरून चोरट्यांनी पोबारा केला. हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.