Chakan : पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – भावकीतील जुन्या वादाच्या कारणावरून एकाने पिस्तूल दाखवत गोळ्या झाडून ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार गुरुवारी (दि. 1) दुपारी खेड तालुक्यातील बहुळ येथे घडला. यातील आरोपीला गुन्हे शाखेने गावाजवळ असलेल्या डोंगरातून ताब्यात घेतले. आरोपीकडे एक गावठी कट्टा आणि एक छ-याची बंदूक आढळून आली आहे.

Pimpri : भाटनगरमधून दोन किलो गांजा जप्त

अशोक गोविंद वाडेकर (वय 47, रा. हबमाळव वस्ती, बहुळ, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हनुमंत राजाराम वाडेकर (वय 41, रा. बहुळ, ता. खेड) यांनी चाकण (Chakan ) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भावकीतील जुन्या भांडणाच्या कारणावरून अशोक याने फिर्यादी हनुमंत यांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, मारहाण, धमकी आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीला पकडण्यासाठी गुन्हे शाखेने शोध सुरु केला.

दरम्यान आरोपी हा बहुळ येथील हबमाळ डोंगर परिसरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक छ-याची बंदूक असा 24 हजार 500 रुपयांची हत्यारे सापडली आहेत. आरोपीला पुढील कारवाईसाठी चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक इम्रान शेख, अंमलदार शिवाजी कानडे, बाळासाहेब कोकाटे, महादेव जावळे, सोमनाथ बोऱ्हाडे, फारूक मुल्ला, अमित खानविलकर, प्रमोद हिरळकर, अजित रूपनवर, विशाल भोईर, मारोती जायभाये, तानाजी पानसरे यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.