Pune – खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना फरार होण्यासाठी मदत करणा-याला चार वर्षांनी अटक

एमपीसी न्यूज – खुनाच्या गुन्ह्यातील  आरोपींना पळून जाण्यास  मदत करणा-या आरोपीला चार वर्षांनंतर पोलिसांनी अटक केली.

सागर वायकर (वय 31, रा. कुंजीरवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम जाधव याचा 2014 मध्ये खून झाला होता. या खुनातील मुख्य आरोपी मामा बाळू चौधरी व त्याच्या साथीदारांना फरार होण्यासाठी वायकर याने स्कॉपिओ गाडी देऊन मदत केली होती. या गुन्ह्यातील इतर आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली होती.  वायकर हा चार वर्षापासून फरार होता. भारती विद्यापीठ येथे गस्त असताना पोलिसांना खब-याकडून वायकर हा कुंजीरवाडी येथे त्याच्या घरी आला आहे अशी माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार कुंजीरवाडी येथे जाऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे चौकशी केली असता परशुराम जाधव यांच्या खुनातील फरारी आरोपी मामा बाळु चौधरी याने व त्याच्या इतर साथीदाराना पळून जाण्यास मदत केल्याची कबूली दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाकडून पोलीस कस्टडी रिमांड घेऊन अधिक तपास करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.