Wakad News : भाई असल्याचे सांगत लोखंडी कोयत्याने दहशत माजवून हाताने मारहाण करणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज – भाई असल्याचे सांगून लोखंडी कोयत्याने दहशत माजवून हाताने मारहाण करणाऱ्या आरोपीस वाकड पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अश्विन सिंग, (वय 17, रा. नढे नगर काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात बुधवारी 7 सप्टेंबरला फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी मन्या उर्फ प्रतीक घोडके, (वय 22 ,रा. काळेवाडी) व त्याच्याबरोबर त्याचे तीन अनोळखी मित्र. पूर्ण नाव पत्ते माहीत नाहीत.या आरोपींच्या विरोधात वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी घोडके याला अटक करण्यात आले आहे.

Women From Prostitution : पोलिसांनी केली वेश्याव्यवसायातून पाच महिलांची सुटका

6 सप्टेंबरला रात्री 9 ते 9:30 दरम्यान फिर्यादी व त्याचे मित्र कुणाल चौधरी, तेजस वराडे व अनुज गोड गप्पा मारत जीवन चौक काळेवाडी येथून पायी चालत जात होते.त्यावेळेस त्या ठिकाणी काही मुले दारू पिऊन मोठमोठ्याने शिव्या देत होती म्हणून फिर्यादीने त्यांच्याकडे पाहिले. त्याचा राग येऊन आरोपी यांनी फिर्यादी या हाताने मारहाण करून आरोपी घोडके यांनी फिर्यादीच्या डोक्याच्या मागील भागावर कोयत्याने वार करून दुखापत केली.

“मी मन्या घोडके पिंपरी चिंचवडचा भाई काळेवाडीमध्ये राहायचे असेल तर इज्जतीत राहायचे नाही तर मी एक एकाला जिवंत सोडणार नाही”, असे म्हणून त्याच्या हातातील लोखंडी कोयता हवेत फिरवून लोकांमध्ये दहशत माजवत होता. त्यावेळी तिथे जमा झालेले लोक भीतीने सैरावैरा पळू लागले.भांडण सोडविण्याकरिता फिर्यादी यांचे मित्र मध्यस्थी करण्यास आले असता मन्या घोडके व त्याच्या मित्रांनी फिर्यादीच्या तीन मित्रांना हाताने मारहाण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.