Nigdi : सराईत वाहनचोरास अटक; सहा दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – गुन्हे शाखा युनिट तीन आणि वाहन चोरी विरोधी पथकाने एका सराईत वाहन चोराला अटक केली. त्याच्याकडून 2 लाख 10 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

ज्ञानेश्वर खंडू गांडगे (वय 21, रा. देहूगाव. मूळ रा. नाथापूर, बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट तीन आणि वाहन चोरी विरोधी पथकाच्या पोलिसांना माहिती मिळाली की, निगडी येथील मधुकरराव पवळे उड्डाणपुलाजवळ एक तरुण थांबला आहे. त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची आहे. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून ज्ञानेश्वर याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता ती चोरीची असल्याचे निष्पना झाले. त्यावरून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पिंपरी-चिंचवड आणि परिसरातून सहा दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी 2 लाख 10 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या. या कारवाईमुळे निगडी पोलीस ठाण्यातील दोन, विश्रामबाग, देहूरोड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे चार गुन्हे उघड झाले असून दोन दुचाकीच्या मालकांचा शोध सुरू आहे.

ही करवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त  आर आर पाटील, श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस कर्मचारी विवेकानंद सपकाळे, हजरत पठाण, सचिन उगले, विठ्ठल सानप, गंगाधर चव्हाण, जमीर तांबोळी, सचिन मोरे, यदु आढारी, योगेश्वर कोळेकर, महेश भालचिम, नाथा केकाण, राजकुमार हनमते, सागर जैनक, त्रिनयन बाळसराफ यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.