Wakad : मालिश करण्याच्या बहाण्याने येऊन दागिने चोरणा-या महिलेला अटक

गुन्हे शाखा युनिट चारची कारवाई

एमपीसी न्यूज – मालिश करण्यासाठी महिलेच्या घरी जाऊन तिचा विश्वास संपादन करून घराची चावी घेतली. बहिणीच्या प्रियकराच्या मदतीने बनावट चावी बनवून महिलेच्या घरातून सोन्याचे दागिने चोरून नेले. या चोरट्या महिलेला गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

महादेवी शंकर बुलाणी (वय 29, रा. मंजाळ चाळ, क्रांतीविर कॉलनी, नढेनगर काळेवाडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला दोन दिवसांपूर्वी काळेवाडी परिसरात एक घरफोडीचा गुन्हा घडला. घरफोडी करणारी महिला आरोपी काळेवाडी येथे असल्याची माहिती पोलीस हवालदार धर्मराज आवटे व सहायक फौजदार वासुदेव मुंढे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी महादेवी हिला ताब्यात घेतले. तिच्याकडे चौकशी केली असता तिने चोरी केल्याची कबुली दिली.

मालीश करण्यासाठी आरोपी महादेवी वृद्ध महिलेच्या घरी गेली. तिचा विश्वास संपादन करून भाजी आणण्याचा बहाणा करून वृद्ध महिलेकडून तिच्या घराची चावी घेतली. ही चावी तिच्या बहिणीच्या प्रियकराकडे देऊन बनावट चावी बनवून घेतली. त्यानंतर महादेवी हिने वृद्ध महिलेच्या घराचे लॉक उघडून घरातून सोन्याचे दागिने चोरून नेले. तिच्याकडून काही सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपासासाठी तिला वाकड पोलिसांकडे देण्यात आले आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, पोलीस उप निरीक्षक हर्षल कदम, पोलीस कर्मचारी वासुदेव मुंढे, अदिनाथ मिसाळ, नारायण जाधव, धर्मराज आवटे, संजय गवारे, संतोष असवले, लक्ष्मण आढारी, गोविंद चव्हाण, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, तुशार काळे, धणाजी शिंदे, आजीनाथ ओंबासे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.