Pimpri : तडीपार असलेल्या गुंडाला पिंपरीमधून अटक

464

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातून दीड वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला पिंपरी पोलिसांनी पिंपरी मधून अटक केली. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी गुरुवारी (दि. 13) दुपारी तीनच्या सुमारास पिंपरी मधील रामनगर येथे करण्यात आली.

बाळू रोहिदास मोहिते (वय 31, रा. राम मंदिराच्या मागे, रामनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 142 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी पोलीस ठाण्यातून 11 जानेवारी 2018 रोजी बाळू याला 18 महिन्यांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. त्याचा तडीपारीचा कालावधी अदयाप संपला नाही. गुरुवारी पिंपरी पोलिसांना बाळू पिंपरी मधील रामनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनचे उपायुक्त गणेश शिंदे यांच्याकडे बाळू याच्या तडीपारीचा अहवाल पिंपरी पोलिसांनी सादर केला होता. त्यानुसार पोलीस उपायुक्तांनी त्याला दीड वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून सुधारित महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 56 (1) (ब) नुसार तडीपार केले होते. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_24_Oct
HB_POST_END_FTR-A3
%d bloggers like this: