Vande Bharat Mission : ‘वंदेभारत’ अभियानां’तर्गत मुंबईत 57 हजारांहून अधिक नागरिकांचे आगमन

Arrival of more than 57,000 citizens in Mumbai under 'Vandebharat' campaigns Arrival of more than 57,000 citizens in Mumbai under 'Vandebharat' campaigns Arrival of more than 57,000 citizens in Mumbai under 'Vandebharat' campaigns Arrival of more than 57,000 citizens in Mumbai under 'Vandebharat' campaigns. 31 ऑगस्ट पर्यंत आणखी 54 विमानांनी येणार प्रवासी

एमपीसी न्यूज – वंदेभारत अभियानांतर्गत मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचा ओघ सातत्याने सुरुच आहे. आतापर्यंत 419 विमानांनी तब्बल 57 हजार 362 प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले आहेत. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत आणखी 54 विमानांनी विविध देशातून प्रवासी मुंबईत येणार आहेत.

आलेल्या एकूण प्रवाशांमध्ये 19 हजार 383 प्रवासी मुंबईतील आहेत. तर 19 हजार 570 प्रवासी उर्वरित महाराष्ट्रातील आहेत.

इतर राज्यातील प्रवासी देखील मुंबईत उतरत आहेत. तिथून त्यांच्या मूळ गावी जाण्याची व्यवस्था केली जात आहे. इतर राज्यातील 18 हजार 409 प्रवासी मुंबईत उतरले आहेत.

कोरोना विषाणुविरुद्ध शासन निग्रहाने लढत आहे. दरम्यान विदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना मुंबईत आणले जात आहे.

त्यांना क्वारंटाईन करण्याची तसेच अन्य व्यवस्था करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाकडून केली जात आहे.

या देशातून आले प्रवासी

ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनिशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया,स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया,मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया, रोम, जर्मनी,दुबई,मालावी,वेस्ट इंडिज,नॉर्वे, कैरो, युक्रेन,रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड सौदी अरेबिया, कॅनडा, पूर्व अफ्रिका, फ्रान्स, नैरोबी, न्युयॉर्क, जॉर्जिया, कामेरुन, युनायटेड अरब अमिराती, कांगो अशा विविध देशातून प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत.

आलेल्या प्रवाशांचे क्वारंटाईन

बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे.

हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग यांच्या 24 मे 2020 च्या मार्गदर्शक सूचनेनुसार आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.

इतर राज्यातील प्रवाशांचे वाहतूक पासेस संबंधित राज्याकडून प्राप्त होईपर्यंत या प्रवाशांना मुंबईतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे. तसेच या प्रवाशांचे वाहतूक पास संबंधित राज्याकडून प्राप्त होताच त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येत आहे.

वंदेभारत अभियानातील कामकाज जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, बृहन्मुंबई महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बेस्ट, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ, भारतीय विमानतळ प्राधीकरण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण लिमिटेड यांच्या समन्वयाने केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.