Article by Harshal Alpe : आत्महत्या वाईटच, पण…

  लेखक : हर्षल आल्पे, तळेगाव दाभाडे

एमपीसी न्यूज : सध्या गेल्या दोन तीन दिवसात आत्महत्येच्या अनेक बातम्या वाचनात आल्या, कला दिग्दर्शक राजू साप्ते आणि एमपीएससी च्या ढिसाळ कारभारामुळे स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येच्या बातमी ने अधिक च विचारात पडायला झाले .

खर तर खूप आयुष्य जगलेल्या आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन काम करणाऱ्या आणि कोवळ्या वयात, ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर असणार्‍या, लाखो स्वप्न उराशी बाळगणार्‍या दोघांची आत्महत्या, खरच चिंता वाढवणारी च आहे. खरच कुणीच समाधानी नाहीये का ? आमच्या समाजामध्ये अस काही तरी नक्की झालय की आम्हाला आमचा जीव सुद्धा स्वस्त वाटू लागलाय .

कोरोना आणि लॉक डाउन च्या या अस्थिर जमान्यात, प्रत्येकाला च काही ना काही दुख्ख आहेच, आर्थिक विवंचना खूप मोठ्या आहेत, त्यातच मानसिक अस्थिरता खूप वाढलेली दिसते आहे, आम्ही आधार शोधतोय, पण प्रत्येकालाच आधार मिळतोय का ? नाही, मिळताना दिसत नाहीये, आज कुणाकडेच या प्रश्नाच उत्तर नाहीये, की हे सगळ संपणार तरी कधी, प्रत्येक वेळेला जरा स्थिर आणि चांगलं होण्याची अपेक्षा वाढली, की लगेच कोरोना किंवा इतर काही पुन्हा डोक वर काढण्याचीच भाकीत होतात, आणि मग त्याच्या काळजीपोटी पुन्हा लॉक डाउन !!!! 

झालेल्या या दोन आत्महत्या, त्यांची कारणे वेगवेगळी जरी असली तरी एक नक्की की मानसिक अस्थिरता खूप मोठी आहे, “आज न उद्या मरायचच आहे ना, मग आजच का नाही” ? असले विचार तर आपण करत नाही आहोत ना ? आणि अश्या विचारांपर्यंत जर आपण येत असू, परिस्थिति मुळे, तर पुन्हा एकदा शासन, प्रशासन, आणि सगळ्यांनीच एकदा सगळ्याचा आढावा घेऊन ठोस काही करण्याची गरज आहे, कारण मानसिक लॉक डाउन करून, मृत्यू ला कवटाळून प्रश्न कधीच सुटत नाहीत, उलट अजून च जटिल बनतात, हे लक्षात घ्या. हा लेख लिहीत असताना अस कानावर आलं, की मुंबई किंवा अनेक शहरांमध्ये आर्थिक संकटात सापडलेल्या अनेकांना भाड थकल्याबद्दल मालकांकडून घर खाली करण्याच्या नोटिसा आणि काहींना तर धमक्या मिळत आहेत, कुठे जायच अश्या बेघरांनी, कुणाकडे पाहायच ??? एक तर कोविड मुळे श्रीमंत असो वा गरीब, सगळे च जण अस्थिर झालोय, जो तो स्वताहाचा विचार करायला लागलाय, आणि त्यात चूक ही नाही आणि त्यातून काही बरोबर अस घडत ही नाहीये .. मग मदत कोण करणार ? न्याय कुणाकडे मागणार ???

इतका सगळा नकारात्मक विचार आला की सर्वात प्रथम आठवतात आपली च रक्ताची ,  जिवाभावाची, जवळ ची नाती, त्यांचा विचार डोक्यात आलाच पाहिजे , आत्महत्येमुळे फक्त एक जीव संपतो, पण त्या नंतर हजारो प्रश्न संपूर्ण समाजासमोर आ वासून उभे राहातात , आत्महत्या हा काही उपाय नाही, आणि त्याला प्रवृत्त करणार्‍यांनी हा विचार केला पाहिजे , की अशी वेळ आपल्यावर ही येऊ च शकते, तेव्हा आपण कुठे पळणार? आत्महत्येच्या दारापाशी जे कुणी असतील आणि जे आत्ता हे वाचत असतील, त्यांना एकच सांगावंस वाटत, की एकदा या सगळ्या समस्या विसरून फक्त आपल बालपण आठवा, आपली नाती आठवा, आपल यश, आपला आनंद आठवा ना राव ! मग बघा ना, हे सगळ फालतू वाटेल, आणि आपण आत्महत्येचा विचार च करणार नाही .

सरकारांकडून फक्त एकच अपेक्षा की, हे लॉक डाउन, ही बंधने लावून प्रश्न सुटत नाहीयेत ,किंवा काही प्रमाणात सुटत ही असतील, पण येणार्‍या उद्या कडे मात्र खूप प्रश्न यातून निर्माण झालेले जसे च्या तसेच आहेत, त्यांना उत्तर देण्याची तुमची तयारी हवी, प्रत्येकाला दिलासा तुम्ही सरकार म्हणून तुम्हीच द्यायला हवा, त्या वेळी हात आखडता घेतलात, तर हे आजचे भविष्य तुम्हाला माफ करणार नाही, तूर्त आज तरी ही स्पेस ब्लॅंक च आहे, जी तुम्हाला, मला आणि समाजाला भरून काढायची आहे, पळून न जाता, आत्महत्या वैगेरे न करता, आपल्या नात्यांसाठी आपल्याला जगायचे आहे, आहेच !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

धन्यवाद …..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.