Article By Harshal Vinod Alpe : एकला पडदाच का उपाशी ? बाकी तुपाशी !!!!

लेखक : हर्षल विनोद आल्पे

एमपीसी न्यूज : लॉक डाउन नंतर पुनश्च हरी ओम होत असताना, आणि सर्व उद्योग धंदे पुन्हा एकदा खर्‍या अर्थाने सुरू होत असताना एक रुखरुख वाटते , की खरच आपण खरच सावरलो आहोत का ? आपण खरच भविष्यातील गगन भरारी साठी आतून तयार आहोत का ? का, अजून ही आपण मनाने 2020 मधल्या त्या कडक लॉक डाउन मध्ये आहोत, हा ही प्रश्नच आहे.

सर्व गोष्टी आपण लोकांचा विचार करून सुरू करीत आहोत, पण ! एका गोष्टी कडे मात्र अजून ही दुर्लक्षच करत आहोत, जी जागा खर तर सर्व सामान्य लोकांच्या, जगण्याशी, मनोरंजनाशी आणि एकूणच जगण्याचा भाग असलेली, जागा सुरू करण्याबाबत कुणीच काही बोलत नाहीये, मोठमोठे malls, multiplexes, व्यापारी संकुले आम्ही काही अटी आणि नियमावली पाळून सुरू केली, पण, एक पडदा चित्रपट गृहांचे काय ?

एक काळ असा होता, जेव्हा मनोरंजनासाठी टी. व्ही. किंवा अधिक साधने सामान्य माणसासाठी उपलब्धच नव्हती त्या वेळी सर्व सामान्यांना हाच एक पडदा चित्रपटगृहांचा आधार होता. मग ते सुट्टीत लहान मुलांसाठी चे बालचित्रपट पाहायला घेऊन जाणे असो, की स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला चित्रपट आपल्या लेकी बाळीना घेऊन जाणे असो, तर कधी एक तूफान चाललेला, मारामारी असलेला अथवा निखळ विनोदी चित्रपट बघायला जाणे असो. जवळच्या अथवा लांबच्या सुद्धा एक पडदा चित्रपट गृहात जाऊन चित्रपटाचा खेळ पाहणे ( होय, खेळ च, आज ही एक पडदा चित्रपटाचे खेळच होतात, शोज हे फक्त ott किंवा मल्टीप्लेक्सेस मध्ये होतात, हेच रूढ आहे ) हे तर सामान्य गरीब व माध्यम वर्गीय माणसाचे व्यवछेदक लक्षण आहे, आणि आज तेच बंद आहे …

खर तर कोरोना च्या या जमान्यात आपण जगण्याचा प्रयत्न च करत आहोत , डोक्यावर सतत एक टांगती तलवार आहे , सर्व शक्तिमान असलेल्या माणसाला मृत्युची एवढी भीती ही या वेळी पहिल्यांदाच एवढी गडद वाटत आहे का ? या आधी ही अशी संकटे आली , गेली , महामारी आली , पण जग बंद करून दाखवायची किमया याच कोरोंना ने करून दाखवली , विषय तो आहेच , पण चिंता वाटते ते माझ्या मायबोलीतील मराठी चित्रपटांविषयी आणि एक पडदा चित्रपटगृहांविषयी ,जे की हक्काचे व्यासपीठ आहे माझ्या मराठी चित्रपटांसाठी , मराठी चित्रपटांना बाकी कोणी ही थारा दिला नाही , परवाह नाही ,पण ! एक पडदा चित्रपट गृह च अनिश्चित काळासाठी बंद राहाण हे काही फार हितावह नाही.

जसे नाटकाचा पडदा आम्ही त्यावर सर्व अर्थाने अवलंबून असलेल्यांसाठी उघडला, आणि आता तिथे 50% क्षमते सह तिथे नाटक ही सादर होत आहेत ,तसाच विचार एक पडदा चित्रपट गृहांवर अवलंबून असणार्‍यांसाठी का नाही ??? संबंधित कुणाला ही विचारले की कधी सुरू होणार ? त्यावर उत्तर एकच , माहिती नाही ,असे का ?

आज इतके  दर्जेदार मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असताना आम्ही या गोष्टीवर गांभीर्याने विचार करायला तयार च नाही आहोत , बर ! मल्टीप्लेक्सेस वाल्यांना ही चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी काही मर्यादा आहेत , त्यातच काहींची मनमानी सुरू असेलच , यातून भयाण वास्तव म्हणजे काही लोकप्रिय समाजमाध्यम आणि चित्रपट विषयक ott वाहिन्या यांनी तर मराठी ला वाळीत टाकल्याचेच चित्र आहे , अश्या वेळी मराठी चित्र कर्त्यांनी जायचे कुठे ? का , त्यांनी चित्रपट बनवणे च बंद करावे का ???? हिन्दी आणि इतर भाषांसाठी खूप पर्याय आहेत ,पण माझ्या माय मराठी साठी च कोरोंना आडवा आला की काय ? असा प्रश्न पडतो …

लवकरात लवकर यावर ही विचार होऊन नियम व अटींसह एक पडदा चित्रपट गृहे सुरू करावीत आणि तिथे मराठी चित्रपटांना खास जागा देण्यात यावी, हक्काची एवढेच मागणे या मायबाप सरकारला , बाकी काही नाही …………………….!

चुकभुल द्यावी घ्यावी ……

धन्यवाद …….

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.