Religion Controversy : धर्माचे आणि जातींचे विभाजन अजून किती काळ चालणार? – एक यक्ष प्रश्न!

एमपीसी न्यूज – हर्षल विनोद आल्पे – सध्या जे काही सुरू आहे, राजकीय पातळीवर, ते पाहता सर्वसामान्यांच्या दृष्टीने नकारात्मकच चित्रण (Religion Controversy) दिसत आहे. एकीकडे वाढती महागाई आहे तर दुसरीकडे जात, पात, धर्म आणि इतर गोष्टींवरून फक्त आणि फक्त राजकारणच सुरू आहे .

खरतर आपण वैश्विक विचार कधी करणार हा प्रश्न पडतो. या समाजामध्ये खूप कमी लोकं अशी पाहायला मिळतात की जी वैश्विक विचार करतात. सध्या सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेणे हे जरा अवघड जागेचे दुखणे झाले आहे.

नाण्याच्या दोन्ही बाजू तपासल्या, समजा त्यातल्या एका बाजूने आपण उभे राहिलो तर दुसरी बाजू समाजमाध्यमावर अत्यंत अर्वाच्च भाषेत आपल्यावर व्यक्तीगत चिखलफेक करत असते, हे आपण थांबवू शकत नाही? काही राजकीय पक्षांचे नेते हे या अशा गोष्टींना खतपाणी घालताना दिसतात. समाज म्हणून हे अत्यंत चुकीचे आहे. विशेषत: जेव्हा लोक गेलेल्या माणसाची जात काढून त्याच्या कर्तृत्वावर शिंतोडे उडवू पाहतात, तेव्हा या समाजात राहावे कसे? हा ही प्रश्न पडतो.

आपल्याकडे अशी अनेक (Religion Controversy)उदाहरणे आहेत, ज्यांनी आपली आडनावे ही बदलून दुसरीच धारण केली. 2000 च्या दशकामध्ये काही भागांमध्ये नावे बदलण्याची प्रक्रिया करण्यासाठी जेव्हा हजारो अर्ज आल्याची बातमी आली होती, तेव्हा एका शोध पत्रकाराने या मागची बाजू पाहण्याचा आणि नंतर ते सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, की “हे लोक असे एका रात्रीत नाव का बरे बदलू पाहत असतील”, तेव्हा लक्षात आले की त्या भागामध्ये जातीजातीत तेढ निर्माण केली जातीये आणि काही लोकांना समाजातून बहिष्कृत करण्यासाठी हालचाली होत आहेत.

तेव्हा त्यावर उपाय म्हणून काही लोकांनी आपली आडनावेच बदलून घेतली. अर्थात शोध पत्रकाराची ही शोध पत्रकारिता काही लोकांसमोर आली नाही, ती फक्त संगणकावरील एका फाइलपुरतीच मर्यादित राहिली राहिली . एक दोन ठिकाणी त्याने प्रयत्न करून पाहिले ही असतील, पण कुणीच ते छापण्याचे धारिष्ट्य दाखवले नाही. उलट त्याला दूसरा लोकप्रिय विषय घेण्याचे आणि हा विषय सोडून देण्याचे सल्ले अनेकांनी दिले आणि “पापी पेट का सवाल” या विचाराने त्यांनी ही ते सोडून दिले .

आजकाल कुठल्या विषयाला अचानक धार्मिक आणि राजकीय रंग चढेल हे काही सांगता येत नाही. भोंगे आणि त्या निमित्ताने येणारे ध्वनिप्रदूषण यावर एक राजकीय नेता एका सभेत बोलला, खरंतर तो या आधी ही सातत्याने या विषयावर बोलतच होता, हे जरा त्याच्या आधीच्या अनेक भाषणांचा अभ्यास केल्यावर लक्षात आले. खरंतर तो जातीव्यवस्थेवर आणि धार्मिक बाबतीत सुद्धा बोलत होता, पण त्या वेळी त्याच्या या विषयांना महत्त्व मिळाले नाही. कदाचित ती त्यावेळची ती “वैचारिक गरज” ही नसेल. आज मात्र कदाचित माध्यमांसकट सगळ्या विचारवंतांची ती गरज असेल किंवा मार्केटिंगच्या यशस्वी नियमाप्रमाणे ती निर्माण केली जात असेल, हे संबंधितच जाणे!

पण त्या नेत्याने तो मुद्दा उठवला आणि नीट विचार केला तर तो सामाजिक मुद्दाच आहे, पण आपल्याकडे सामाजिक मुद्द्यावर ही राजकारण करता येऊ शकते आणि प्रत्येकचवेळी ते चांगल्या पद्धतीनेच असेल असे ही नाही हे आपल्या सर्व राजकीय नेत्यांनी आजवर ही कला म्हणून चांगली प्रस्थापित केली आहे जणू सर्व हे त्याचेच गोंडस फळ!

मुळात हे फार पूर्वीपासूनच प्रचलितच (Religion Controversy)आहे आपल्या राजकारणामध्ये, की धर्माचे आणि जातींचे घोळ घातल्याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही. समाजात दुही माजवायची, किंवा एखाद्या नेत्याच्या एका वाक्यावर वादंग निर्माण करून ते पार दंगलीपर्यंत घेऊन जाऊन आपले राजकारण तापवत ठेवायचे हेच तर होत आलेले आहे.

Yogi Sarkar : उत्तर प्रदेशमध्ये सर्व मदरशाची सुरुवात होणार राष्ट्रगीताने – योगी सरकारचा आदेश

छान अभ्यासपूर्ण मांडणी करून,भरपूर व्यासंग करून खर्‍या अर्थाने विकासाचे स्वप्न दाखविणारे आदर्श नेते आज फार कमी आहेत. जे आहेत त्यांना मतांच्या या जंजाळात फारसा पराक्रम करायला वाव दिसत नाही. एका क्षणी त्यांना ही या जाती-पातीच्या, धर्माच्या राजकारणात उडी घ्यावीच लागते. अन् मग ते ही आपले अस्तित्व टिकवण्यासाठी, काही क्षणी वाढवण्यासाठी इच्छा नसताना या मार्गावरून चालू लागतात.

आर्य चाणक्याच्या वाक्याप्रमाणे मार्ग वाईट अथवा चांगला नसतो, तर माणसाची प्रवृत्ती आणि कृती तो मार्ग चांगला अथवा वाईट हे ठरवत असते. समाज म्हणून आता या गोष्टीवर आपण बारकाईने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या क्षणी आपल्या लोकशाहीत हा विचार डोळसपणे होईल, त्या क्षणी अगदी त्या क्षणी आपली विचार करण्याचीच नव्हे तर कृती करण्याची ही दिशा बदलेल. कारण मूलभूत गरजा जर पूर्ण करावयाच्या असतील तर तिथे काही तुमचा जात धर्म येत (Religion Controversy) नाही. त्या सगळ्या मानसिक गोष्टी आहेत, पण त्याने समाजाचे पोट भरत नाही. हे आपल्या राज्यकर्त्यांनी आणि राजकारणातल्या सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे

एवढेच………!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.