Article by Prabha Vilas: 100 डेज इन लॉकडाऊन

लॉकडाऊनच्या काळातील सलग 100 दिवस नेटाने वस्तीमध्ये जाऊन कधी, ऑनलाईन तर कधी ऑफलाईन अशा वेगवेगळ्या प्रकारे समुदाय व मुलांसोबत राहिलो ज्यातून त्यांनाच नाही तर आम्हाला सुद्धा हा विश्वास आला की  आपण खरंच एकमेकांसाठी आहोत. या काळात आम्ही रेशन, शिक्षण, स्त्रियांवरील व मुलांवरील हिंसा अशा अनेक अतिमहत्त्वाच्या मुद्यांवर अनेक संस्था संघटनांच्या मदतीने, प्रशासनासमोर आमची भूमिका व जमिनिस्तरावरील वास्तव काय आहे हे वेगवेगळ्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. “100 डेज इन लॉक डाऊन” ही पुस्तिका ‘वर्क फॉर इक्वालिटी’ या संस्थेने नुकतीच प्रकाशित केली. या उपक्रमाबद्दल संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांचा विशेष लेख….

—————————————————-

100 डेज इन लॉकडाऊन

लॉकडाऊनचा काळ हा एकमेकांना कोरोनापासून वाचविण्यासाठी महत्वाचा आहे, तेवढाच तो आपण एकमेकांच्या सोबत आहेत हे सांगण्याचा देखील आहे . या कठीण काळामध्ये बेघर, वंचित समुदायासोबत वर्क फॉर इक्वालीटी ही संस्था नेटाने उभी राहून अन्नधान्य, मुलांचे शिक्षण, मानसिक आरोग्य अशा अतिमहत्वाच्या मुद्यांवर आम्ही आपल्या बांधवाच्या सोबत संकटाच्या काळात आहोत.

या संपूर्ण कालावधी आम्ही सलग 100 दिवस नेटाने वस्तीमध्ये जाऊन  कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन अशा वेगवेगळ्या प्रकारे समुदाय व मुलांसोबत राहिलो ज्यातून त्यांनाच नाही तर आम्हाला सुद्धा हा विश्वास आला की आपण खरंच एकमेकांसाठी आहोत. या काळात आम्ही रेशन, शिक्षण, स्त्रियांवरील व मुलांवरील हिंसा अशा अनेक अतिमहत्त्वाच्या  मुद्यांवर अनेक संस्था संघटनांच्या मदतीने, प्रशासनासमोर आमची भूमिका व जमिनिस्तरावरील वास्तव काय आहे हे वेगवेगळ्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला.

या संपूर्ण प्रक्रियेला नुकतेच 100 दिवस पूर्ण झाले. या 100 दिवसांच्या अनुभवांचे संकलन करणाऱ्या पुस्तिकेचे आम्ही खेड पंचायत समितीचे सभापती अंकुशराव राक्षे यांच्या हस्ते एका ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रकाशन करण्यात आले. “100  डेज इन लॉकडाऊन” ही पुस्तिका आपल्या हाती देतांना आनंद होत आहे. यात मुलांनी घेतलेली मूल्ये आहेत, त्यांची  समाजाप्रती असलेली संवेदनशीलता तर आहेच पण आपल्या अडचणींबद्दल खुले पणाने बोलण्याचे धाडस सुद्धा यात आहे.

जमीनस्तरावरील वास्तव समजण्यासाठी सर्वेक्षण

जमीनस्तरावरील वास्तव समजण्यासाठी आम्ही आमच्या संपर्कात असलेल्या विभागांचे सर्वेक्षण केले. त्यातून आम्हाला  अन्नधान्य, शिक्षण आणि मानसिक  आरोग्यावर काम करण्याची खूप गरज आहे हे जाणवले.  लोकडाऊनच्या काळामध्ये सर्वात मोठा मुद्दा होता अन्नधान्याचा. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही गरजू व बेघर लोकांना शिजवलेले अन्नवाटप केले, त्यानंतर  आमच्या संपर्कात असलेल्या आणि नसलेल्या लोकांना धान्यवाटप केले.

एवढंच करून भागणार नाही हे समजून आम्ही “वन नेशन, वन रेशन कार्ड” या धर्तीवर वंचित समुदायातील ज्या लोकांना रेशनकार्ड नव्हते, ज्यांचे राशनकार्ड बंद होते, ज्यांचे राशनकार्ड व ते दोन्ही वेगवेगळ्या गावांमध्ये होते, अशांसाठी शासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हा विषय कसा मार्गी लावता येईल, यासाठी काम करतो आहोत. अजूनही हे काम अर्धवटच आहे, शासनाने अशा अतिमहत्त्वाच्या मुद्यांकडे या काळात संवेदशीलतेने पाहण्याची गरज आहे. कारण बेघर, भटक्या लोकांसाठी आता शासनाच्या माध्यमातून मिळणारी मदत खूप मोलाची आहे पण त्यापर्यंत अनेक अडचणीमुळे गरजू लोक पोहचू शकत नाही.

वंचित समुदायमध्ये  का काळात पोटापाण्याच्या भ्रांतीमुळे, हाताला काम नसल्यामुळे महिला व मुलांवरील हिंसेचे प्रमाण खूप वाढलेले दिसले. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या स्थितीमध्ये आपण मुलांच्या आणि कुटुंबाच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे हे समजून आम्ही अतिशय कडक नियमांमध्ये मुलांच्या लहान गटांना भेटणे,  बोलणे,फोनवरून संपर्कात राहणे, ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी मोबाईलवर  ऑनलाईन मीटिंग समुदायातून लोकांना तयार करून त्यांच्या करवी मुलांपर्यंत पोहचणे असे अनेक उपक्रम सुरु ठेवले.

शाळांमध्ये सुविधांची गरज

त्यामुळे मुले खूप काही शिकली आणि त्यांना दिवसातून किमान २ तास तरी संस्थेसोबत वेळ घालविताना खूप मजा, आनंद मिळू लागला. या सर्वाचा फायदा असा झाला की, मुलांना मदतीची गरज वाटली तेव्हा तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत आहोत हा विश्वास मुलांना मिळाला. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न खूप मोठा आहे. खरतर सर्वच मुलांसाठी शाळेला पर्यायी व्यवस्था काहीच असू शकत नाही, पण त्यातल्या त्यात देखील सध्याच्या काळात बेघर, भटक्या , वंचित मुलांना शाळेशिवाय काहीच पर्याय नसल्यामुळे आम्ही शासनदरबारी सतत शाळांमध्ये सुविधांची किती गरज आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. 

या कामी आमच्यासोबत असलेल्या तरुण मुलींनी याचे नेतृत्व केले. त्यांनी त्यांच्या अडचणी पुढे मांडल्या, शिक्षणमंत्र्यांना एकत्रितपणे शेकडो पत्र पाठविली. त्याचा पाठपुरावा केला. याचाच परिणाम म्हणून किमान खेड तालुक्याने जिल्हा परिषदेच्या ३०० हून अधिक शाळांसाठी शौचालयांची सोय,  मुलींसाठी डिग्निटी रूम, सॅनेटरी पॅड अशा सोयी  मिळतील यासाठी ठराव पास केला गेला आहे. त्यासाठी आम्ही खेड पंचायत समितीचे सभापती अंकुशराव राक्षे यांचे खूप आभारी आहोत.

त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला. या संपूर्ण प्रक्रियेला 23 सप्टेंबरला 100 दिवस पूर्ण झाले. या संपूर्ण प्रक्रियेमधून पुढे लढण्याची ताकद, प्रेरणा, विश्वास आणि सर्वांचे सहकार्य मिळावे म्हणून आम्ही या निमित्ताने समुदाय, मुले, आमच्यासोबत मदत करणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, संघटना, कंपनी यांच्या या 100 दिवसांच्या अनुभवांचे संकलन करणाऱ्या “100 डेज इन लोकडाऊन” या ऑनलाईन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

सव्हेंक्षणातून मिळालेल्या प्रतिक्रिया

  • शाळेमध्ये भरपूर पाणी असायला हवे , शाळेत हात धुण्यासाठी साबण किवा लिक्विड असायला हवे दर तासाला हात धुण्यासाठी सुट्टी द्यायला हवे , क्लासमधील गर्दी कमी करायला हवी. आमच्या शाळेत काहीच सोय नाही, शाळेत पाणी नाही , वर्गात खूप गर्दी आहे , सोबत मुली व मुलांसाठी शौचालय पण नाही त्यात पाणी पण नाही, हात धुण्यासाठी सुद्धा काही सोय नाही. सरकारला आम्ही सांगू की, मोफत मास्क वाटप कारायला पाहिजे, तसेच शाळेत जो आहार दिला जातो, तो पोषक आहार पण मुलांपर्यंत पोहचला पाहिजे.
  • सुरक्षित अंतर ठेवण्यातही एका बेंचवर एक मुलगा किंवा मुलगी बसली पाहिजे, बेंच सुद्धा खूप जवळ जवळ असू  नये, हात धुण्यासाठी पाणी आणि साबण असला  पाहिजे शाळेमध्ये मुलांना कोरोंना पासून बचाव करायचा असेल, शाळेत औषधाची फवारणी केली पाहिजे तसेच शाळेत पाणी आणि साबण आणि मास्क वापरले पाहिजे. – संदर्भ 100 विद्यार्थिनी सर्वेक्षण कोरोना कालावधी- वर्क फॉर इक्वालिटी
  • “आमच्याकडे मोबाईल नाही, लाईट नाही आणि इंटरनेट पण नाही. त्यामुळे माझा काहीच अभ्यास होत नाही. माझ्या आई-वडिलांना मी खूप शिकावे असे वाटते, पण कसे शिकणार? असंच सुरु राहिले तर मी माझा पूर्ण अभ्यास विसरून जाईन आणि माझे कलेक्टर होण्याचे स्वप्न सुद्धा मला पूर्ण करता येणार नाही” –  मी शक्ती गटाची प्रतिनिधी
  • आम्ही कधी आजपर्यंत शाळेमध्ये हँडवॉश पहिलाच नाही, अशा लहान पण अतिमहत्वाच्या गोष्टी आमच्या शाळेत नाही आणि या सुविधा इतर शाळेत पण असतील असं मला वाटत नाही , त्यामुळे शाळेमध्ये पाणी, स्वच्छ टॉयलेट्स, सॅनिटायझरची फवारणी या गोष्टी नियमित केल्या तर आमच्यासारखी हजारो मुले शिकू शकतील” – मी शक्ती गटाची प्रतिनिधी
  • लोकडाऊनच्या काळामध्ये माझ्या गावातील अनेक लहान मुलींची लग्न झाली, घरात खायला नाही आणि काम पण नाही. त्यामुळे लोक मुलींची लहान वयातच लग्न करून टाकत आहेत, हे थांबण्यासाठी आम्ही मुले एकत्र येत आहोत. – मी शक्ती गटाची प्रतिनिधी
  • आम्हाला रेशन मिळत नाही कारण आमच्याकडे रेशनकार्ड नाही, हाताला काम नाही आणि सरकारी योजना पण घेता येत नाही कारण कागदपत्र नाहीत, संस्थेच्या मदतीने एकाच विभागीतील 70 लोकांचे राशनकार्ड काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. आम्हीला हे काम स्वतः करता आले नसते. आम्हाला मदतीची गरज आहे. –  लाभार्थी

या संपूर्ण प्रक्रियेत  RiseUp , आलोचना, KSH, मुदिता, Cummins Inida Ltd, गुंज, CYDA, Knorr-Bremse Global Care Asia Pacific Limited RTE फोरम (राईट टू एज्युकेशन फोरम ), आर्क नेटवर्क, आकार फऊंडेशन, अंनिस, जीवितनदी, लायन्स क्लब तळेगाव, इनरव्हील क्लब तळेगाव, Naishtka Audio and Visual, 1book 1smile , Passion Guru , रेनबो फाउंडेशन, सबकी रसोई, NEYESA  अशा अनेक संस्था संघटना, कंपन्या आमच्या सोबत होत्या.

आदिती देवधर, मृणालिनी वनारसे, संजीवनी मानेगावकर, शिल्पा बल्लाळ, मयुरी मदन सुषमा, कल्याणी सोहनी अशा अनके साधन व्यक्ती मुलांसाठी ऑनलाईन सेशनमध्ये सहभागी झाल्या. RJ माधुरी विजय, आरती भोसले अशा मैत्रिणी देखील सोबत होत्याच. या सर्वांच्या ऋणातच रहायला मला आवडेल.

– प्रभा विलास

संस्थापिका  वर्क फॉर एक्वालिटी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.