ना भूतो, ना भविष्यति! कोरोनाचं संकट घेऊन आलंय संधी!

मंडळी आज आपल्या सगळ्यांनाच खरे म्हणजे ‘ना भूतो ना भविष्यति’ अशी संधी प्राप्त झालेली आहे. आपल्याला एवढा वेळ आज पर्यंत केंव्हाच उपलब्ध झाला नव्हता आणि भविष्यात होईल असे सांगताही येत नाही. पण या लॉकडाऊन मुळे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आणि मिळत आहेत.

ह्या पृथ्वी तलावरचा सगळ्यात हुशार बुद्धीजीवी म्हणून माणूस ओळखला जातो. आपल्याला सगळ्यांसाठी वेळ असतो पण स्वत:साठी वेळ नसतो. आपल्या पैकी किती जणांनी आजपर्यंत युद्धाचा अनुभव घेतला आहे? आपल्याला घरात बसूनच, ह्या युद्धाशी सामना करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. म्हणजे नकळत आपण आपल्या राष्ट्राच्या सैन्यात सामील झालेलो आहोत.

सगळी जण घरातच छान सुखात असतील असेही नाही पण ‘मी आहे’ हा केवढा मोठा आधार आहे. आपल असणं हे फार महत्वाचं आहे आणि त्यासाठीच आपलं घरी बसणं ही तेवढचं महत्वाचं आहे. एखादी गोष्ट स्वीकारली तर सगळ्याच गोष्टी सोप्या होतात. त्यामुळे लॉक डाऊन स्वीकारण हे फार महत्वाचे आहे. आणि हे स्वीकारण हे काम आपल्या मनाचे आहे.

मंडळी आपल्या हार्डवेअर मध्ये असलेले सॉफ्टवेअर म्हणजे आपले मन. हे सॉफ्टवेअर फार महत्वाचे आहे. आपल्या मध्ये किती संयम आहे हे आता लॉकडाऊन मध्ये लक्षात येत. एरवी रस्त्यावर सिग्नलला 60 सेकंद थांबणे अवघड वाटायचे आता 21 दिवस झाले घरी थांबले आहेत. एकूणच यामुळे आपल्या सगळ्यांनाच एक प्रकारची शिस्त लागली आहे. एरवी हात न धुणारे पण आता आपण सहज आणि सारखे हात धुत आहोत.  एकूणच स्वच्छता आणि काळजी आपण पूर्वी पेक्षा जास्त घेत आहोत.

आपल्या कडे संकटांवर मात करण्याचे सामर्थ्य आहेच कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे * कुठलही कुलूप बिना किल्लीचं तयार होत नाही.  कुठलाही खेळ असो वा युद्ध असो आधी ते मनाने जिंकायचे असते. आणि त्यासाठी पाहिजे सकारत्मकता आणि आत्मविश्वास. जगातला प्रत्येक माणुस हा मुळातच पॉझिटिव्ह थिंकर आहे सकारत्मकता ही प्रत्येकाकडेच असते कुणाकडे जास्त किंवा कमी हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. पण सकारत्मकता नाही असा एकही माणूस नाही.

पॉझिटीव्ह थिंकींग करा किंवा सकारत्मक विचार करा असं नुसत सांगण सोप आहे पण म्हणजे काय करायचं. तुम्हाला जर तुमची सकारात्मकता  वाढवायची असेल तर एक साधा प्रयोग करून बघा रोज थोडा वेळ व्यायाम करा, थोडा घाम येऊ दे अगदीच नसेल तर जागेवर उभे राहून जागेवर उंच उड्या मारा 2, 3, 5 आशा वाढवत जा आणि तुमच्यातला आत्मविश्वास वाढत जाईल आणि सकारत्मकता पण वाढत जाईल. हा पण ज्यांना मॉर्निंग वॉकची सवय आहे त्यांनी मात्र बाहेर न जाता सध्या तर घरीच व्यायाम करणे गरजेचे आहे.  काही पाठांतर करा अगदी तुम्हाला आवडत असलेली गाणी असतील, श्लोक असतील किंवा स्तोत्र असेल पण पाठांतर करा. तुमचा तुमच्या स्मरणशक्‍तीचा विश्वास वाढेल आणि स्वत:वरचाही. तर मंडळी ‘ सिर सलामत तो पगडी पच्यास”. “मी आहे’ हीच मोठी गोष्ट आहे, कुठल्याही संकटावर मात करण्यासाठी.

– डॉ. राजीव नगरकर

आयुर्वेदाचार्य, मानसशास्त्रज्ञ

मनाची व्यायामशाळा

९९२१९५१५८८

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.