_MPC_DIR_MPU_III

Pimpri News: अरुण पवार यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट उद्योजक पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – सेंट्रीग कॉन्ट्रॅक्टर ते यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आलेले, तसेच सामाजिक, पर्यावरण संदर्भातील कार्यात अग्रेसर असणाऱ्या अरुण पवार यांना मुंबई येथील छावा शिवकालीन बहुउद्देशीय कलामंच यांच्यावतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

_MPC_DIR_MPU_IV

मुंबई येथे आयोजित समारंभात मुंबईचे सहायक पोलीस आयुक्त राज खतीब, अमित गडांकुश, पोलीस उपनिरीक्षक सोपान राखोंडे यांच्या हस्ते अरुण पवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार भोगळे, संभाजी माने, अरूण पिसाळ, सिहान बोरा, गिरीश जाधव, नगरसेवक रामदास पवळे, अपर्णा पाटील, सौरभ शिंदे, राजेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

कष्ट करण्याची तयारी असेल, तर प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय गाठता येते. असेच काही अरुण पवार यांच्या बाबतीत घडले. परिस्थिती नसतानाही मराठवाड्यातील छोटे गाव ते पुणे शहर हा प्रवास म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे अरुण पवार, अशा शब्दात आयोजकांनी पवार यांचा गौरव केला.

 

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.