BNR-HDR-TOP-Mobile

Pune : अरविंद केजरीवाल अतिरेकी, आपण म्हटले नाही – प्रकाश जावडेकर

0

एमपीसी न्यूज – नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अतिरेकी आहेत, असे आपण म्हटलेच नसल्याची स्पष्ट भूमिका केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मांडली.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते शुक्रवारी बोलत होते. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कुठे दिसलीच नाही. भाजप आणि आम आदमी पक्षात थेट लढत झाली. त्यामुळे पराभव झाल्याचे जावडेकर म्हणाले. या निवडणुकीत आम्हाला खूप शिकायला मिळाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘गोली मारो’ आणि ‘भारत पाक’ ही विधाने भोवल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. या सोबतच इतर करणेही भाजपच्या पराभवाला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. त्याचा अभ्यास सुरू झाला आहे.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement