Zomato’s grocery delivery service : या कारणामुळे झोमॅटो’ची किराणामाल डिलिव्हरी सेवा बंद होणार

एमपीसी न्यूज : ऑनलाईन फूड डिलिव्हरी सर्व्हिस कंपनी झोमॅटोने 17 सप्टेंबरपासून किराणा मालाची डिलिव्हरी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑर्डर पूर्ण होण्यास होणारा विलंब, ग्राहकांचा अल्प प्रतिसाद आणि वाढती स्पर्धा लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला आहे. इतर स्पर्धक कंपन्या मालाच्या घरपोच डिलिव्हरीसाठी 15 मिनिटं घेतात. झोमॅटो यामध्ये मागे पडत होती.

त्यामुळे आता झोमॅटोन ग्रॉफरमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या किराणा भागीदारांना दिलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, “झोमॅटो आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा पुरवण्यावर आणि आमच्या व्यावसायिक भागीदारांना वाढीच्या सर्वात मोठ्या संधी देण्यावर विश्वास ठेवते. आमच्या ग्राहकांना आणि व्यावसायिक भागीदारांना असे फायदे देण्याचा सध्याचे मॉडेल हा सर्वोत्तम मार्ग आहे असे आम्हाला वाटत नाही. म्हणून, आम्ही 17 सप्टेंबर 2021 पासून किराणा मालाची प्रायोगिक वितरण सेवा बंद करू इच्छितो.

झोमॅटोच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही किराणा वितरण पथदर्शी प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या व्यासपीठावर आता कोणत्याही प्रकारचा किराणा वितरण व्यवसाय सुरू करण्याची कोणतीही योजना नाही. या मार्केटमध्ये ग्रॉफर्स खूप चांगली कामगिरी करत आहे, जे 10 मिनिटांत डिलिव्हरीची सेवा देत आहे. अशा परिस्थितीत, या कंपनीतील आमची गुंतवणूक कंपनीच्या भागधारकांसाठी एक चांगला पर्याय असेल.

झोमॅटोने जुलै महिन्यात प्रायोगिक तत्वावर काही शहरांमध्ये किराणा वितरण सुरू केले होते. कंपनी 45 मिनिटांच्या आत किराणा पोचवत होती, हा कालावधी स्पर्धकांपेक्षा खूप जास्त आहे. कंपनीने जुलै 2021 मध्ये ही सेवा सुरू केली. झोमॅटोने ग्रॉफर्समध्येही गुंतवणूक केली आहे. त्यांची कंपनीमध्ये 10 टक्के हिस्सेदारी आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.