PCMC : महापालिकेतील तब्बल 102 अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) तब्बल 102 अधिकारी, कर्मचारी मे अखेर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामध्ये सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश आहे.

Pimpri : पालखी मार्गावरील खड्डे बुजवा, आयुक्तांचे निर्देश

महापालिकेच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदिरात अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते सेवानिवृत्त होणा-या 99 तर स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या 3 अशा 102 कर्मचा-यांचा सत्कार करण्यात आला. सहवास सुटला म्हणजे सोबत काही सुटत नसते,निरोप दिला म्हणजे नाते काही तुटत नसते, धागे असतात जुळलेले हृदयाचे हृदयाशी, त्यामुळे आपला माणूस दूर चालला तरी त्याचेप्रती प्रेम आटत नसते. अशा काव्याने सेवानिवृत्त कार्यक्रमाची सुरुवात झाली. जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे , मंगेश कालापुरे, अभिषेक फुगे, शेखर गावडे,योगेश रानवडे, ज्ञानेश्वर शिंदे , नाथा मातेरे, तसेच कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

सेवानिवृत्त होते असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अनेक वर्षाच्या कामाच्या धावपळीतून आजच्या सेवानिवृत्ती नंतर सुखाचा विसावा मिळणार असून त्याचा त्यांनी आनंद घ्यावा आणि आपल्या जीवनाची पुढील वाटचाल आरोग्य सांभाळून करावी असे मार्गदर्श अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी केले.

कोण झाले सेवानिवृत्त?

सेवानिवृत्त होणा-या 99 अधिकारी आणि कर्मचा-यांमध्ये सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, कार्यकारी अभियंता संजय घुबे, नरेश रोहिला, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, लेखाधिकारी विजय साबळे, इलाही शेख, असिस्टंट मेट्रन श्वेता बनकर,मुख्याध्यापक चंद्रशेखर पंडित,गजाजन कुलकर्णी, उपअभियंता सुनील पाटील, संजय खरात, अशोक आडसुळे, अन्न पर्यवेक्षक दिलीप करंजखेले, उद्यान अधिक्षक गोरख गोसावी,

कार्यालय अधिक्षक शशिकांत जगताप, भांडारपाल अरुण तळेकर, मुख्य लिपिक कांतिलाल वाघेरे, संजय जाधव,पद्मजा बांदल, जयसिंग ओव्हाळ, राजू मोरे, संजय लांडगे, मोहन पवार,लिपिक भगवान बारे,वाहन चालक राजेश रणवरे, सतीश भोईटे, जयसिंगराव पाटील, संजयकुमार चव्हाण,संदीप बहिरट,सुरेश चोरघे,मारुती धोंडगे, उपलेखापाल शिवाजी गराडे,सिस्टर इनचार्ज निशा भोसले,निर्मला भदिरगे, स्टाफ नर्स जया येडवे, लॅब टेक्निशियन अनिल ढुमणे, एक्स रे टेक्निशियन डेव्हीड पगारे, फार्मासीस्ट सुभाष साळवे, कनिष्ठ अभियंता लक्ष्मण वायाळ, नवनाथ शेळके, मिटर निरिक्षक सुर्यकांत फड, धन्नाप्पा हाटकर, वीज पर्यवेक्षक मच्छिंद्र बनसुडे,

मुकुंद पाटील, बाबुराव पोवार, वायरमन अशोक वाबळे, इले. मोटार पंप ऑपरेटर शंकर गरड, हबीबहरुण मुकेबील, शरद शेंडकर, लिडींग फायरमन सुभाष लांडे, रेडिओ मेकॅनिकल.इले फक्कड वाळुंज, वायरलेस ऑपरेटर स्मिता नाथे, सहाय्यक शिक्षक बाळू भोसले, मुख्याध्यापक अहिल्यादेवी जाधव, गौतमी गायकवाड, समीना खान हनमंत भोंगाळे, नंदा काळोखे, उपशिक्षक दत्ताजी पाटील, मंगल पवार, महारूद्र जगदाळे, पुष्पा विनायक कानडे, वॉर्ड बॉय अनिल बारणे, मजूर ज्ञानेश्वर काटे, राजीव चव्हाण, मानसिंग जेधे, दत्तु हरगुडे, दत्तात्रय भोंडवे, प्रभाकर ढोरजे, सुनिल कुंभार, रामदास भवारी, पांडुरंग शिंदे, रमेश सुर्वे, रविंद्र आल्हाट, शंकर शिंदे, शिवाजी कल्हापूरे,

शिपाई शिवाजी मानकर, हंसराज भंडारे, निवृत्ती गव्हाणे, सुदाम बोडके, दिलीप राऊत, चंद्रकांत भालेकर, सफाई कामगार उत्तम वाघमारे, बाळू डोळस, रखवालदार दिपक काथवटे, लालचंद यादव, गोरख पुजारी, सोपान गायकवाड, दिगंबर शेळके, अशोक ताजणे, सुभाष मोरे, दिलीप लांडगे सफाईसेवक संभाजी लोखंडे, कचराकुली पांडुरंग दाते, मुकादम सुनिल गायकवाड, माणिक वाडेकर, अभिमान बगाडे, वाळासाहेब चव्हाण, सुरक्षा सुपरवायझर विठ्ठल कोंढाळकर यांचा समावेश आहे.

तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या 3 कर्मचा-यांमध्ये कार्यकारी अभियंता किशोर महाजन, सफाई कामगार मधुकर म्हस्के, कलाबाई पोटे यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.