Arogyvardhini : आरोग्यवर्धिनी भाग तीन – नवीन भोसरी रुग्णालयात तब्बल सहा हजार कोविड रुग्ण झाले ठणठणीत

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेचे नवीन भोसरी रुग्णालय कोविडग्रस्त रुग्णांसाठी वरदान ठरले. हे रुग्णालय नव्या रुपात सुरु झाल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात कोविडग्रस्त प्रथम रुग्ण मार्च 2019  ला या रुग्णालयात दाखल झाला. त्यानंतर मोठया प्रमाणात कोविड रुग्ण वाढले. तब्बल सहा हजार कोवीडचे रुग्ण या आजारावर मात करीत नवीन भोसरी (Arogyvardhini) रुग्णालयातून गेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल झालेले महापाालिकेचे एकमेव नवीन भोसरी रुग्णालय ठरले.
हे रुग्णालय पुर्ण क्षमतेने सुरु झाले असून विविध विभाग रुग्णांसाठी सुरु करण्यात आले आहेत. जुन्या रुग्णालयातील ओपीडी 400 इतकी होती, नव्या रुपात सुरु करण्यात आलेल्या रुग्णालयातील ओपीडी 600 ते 700 इतकी आहे. या रुग्णालयात माफक दरात उपचार मिळत असल्याने नागरिकांकडून या रुग्णालयात उपचार घेण्यास पसंती दिली जाते.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील रुग्णांसह संपूर्ण राज्यभरातून रुग्ण नवीन भोसरी रुग्णालयात उपचारासाठी येतात. कारण रुग्णालयात स्वच्छता, सर्व सोेई- सुविधा, चांगल्या असल्यामुळे लहानांपासून मोठया पर्यंत रुग्ण उपचार घेण्यास येतात. या रुग्णालयात 14 महिन्यांमध्ये 2 हजार 541 महिलांच्या प्रसूती झाल्या आहेत. त्यात 64 टक्के नॉर्मल तर 36 टक्के सिझेरियन प्रसूती झाल्या आहेत. प्रसूती झालेल्या महिलांसाठी भोसरी रुग्णालया अंतर्गत जननी सुरक्षा योजना राबवण्यात येते. या योजने अंतर्गत प्रसूती झालेल्या महिलांना शासनातर्फे घरी सोडण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सिझेरियन देखील मोफत करण्यात येते. सिझेरियन झालेल्या महिलांना रुग्णालयात पौष्टिक आहार देण्यात येतो.

माफक दरात सुविधा
महापालिकेचे नवीन भोसरी रुग्णालय हे नव्या ईमारतीत सुरु असून या रुग्णालयात 100 बेड आहेत. या रुग्णालयात कान, नाक, घसा , नेत्र विभाग सुरु करण्यात आले आहेत. या  रुग्णालयात  प्रसूती गृह, बालरोग विभाग, अतिदक्षता विभाग, अपघात विभाग, सर्दी , ताप , खोकला विभाग, दंत विभाग, पॅथाॅलाॅजी विभाग, एक्स रे, सोनोग्राफी विभाग, क्षयरोग विभाग, (टी.बी. )  ऑपरेशन थेटर , वैदकीय प्रमाणपत्र, जन्म मृत्यृ विभाग, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम लसीकरण, आदी विभाग चालविले जातात. स्त्रीरोगाशी संबंधित सर्व शस्त्रक्रिया इथे केल्या जातात. गर्भाशयाची पिशवी काढणे, सिझेरियन , कुटुंब कल्याण शस्त्रकिया , तीन महिन्यापर्यंत गर्भपात करणे या सुविधा मार्फक दरात दिल्या जातात.
भोसरी रुग्णालयातील वैदकीय आधिकारी डाॅ. शिवाजी ढगे म्हणाले जेष्ठ नागरिकांना सोई- सुविधा मोफत दिल्या जातात. तसेच प्रसूती पुर्व आणि प्रसूती पश्चात सर्व सुविधा मोफत दिल्या जातात. रुग्णालयात राष्ट्रीय लसीकरण मोहीम राबवली जाते. रुग्णालयात मिळत असलेल्या चांगल्या दर्जाच्या सुविधांमुळे नागरिक येथे उपचार घेण्यास प्रधान्य देत आहेत.
हेमांगी सुर्यवंशी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.