Pune : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका फटाके विक्री दुकानांसंदर्भातील धोरण राबविणार

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या क्षेत्रात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, फटाके विक्री दुकानांसंदर्भात धोरण तयार करण्यात आले असून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. रहिवासी भागात फटाके विक्री दुकानांना परवानगी देण्यात येणार नसून दुकाने आढळ्यास गुन्हे दाखल करणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे. 

शहरात फटाक्यांच्या विक्रीसाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून परवानगी देण्यात येते. गेल्या वर्षी एक हजार फटाके विक्री दुकानांना अग्निशमन विभागाने ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले होते. मात्र, फटाक्यांमुळे होणारे ध्वनी व हवा प्रदूषणाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानुसार, यंदा धोरणाची अबालबजावणी करण्यात येणार आहे.

फटाके विक्री धोरणासंर्भात अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्या दालनात बुधवारी बैठकी घेण्यात अली. या बैठकीत लवकरच एक खिडकी पद्धतीने ऑफ लाईन फटाके विक्रीचे परवाने देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. फटाके विक्रीची दुकाने उभारण्यासाठी जागांची निश्चिती मालमत्ता व्यवस्थापन लवकरच करणार आहे. परवाना मिळवण्यासाठी अग्निशमन दल व आकाशचिन्ह विभागाचा नाहरकत परवाना घेणे आवश्यक असणार आहे. नियमांचे उलंघन करणाऱ्यवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like