Pimpri News : नासा व सिलिकॉन व्हॅली मध्ये 30 टक्के भारतीय असणे हे जितके अभिमानास्पद तितकेच लाजिरवाणे – अपर्णा ललिंगकर

एमपीसी न्यूज : नासा  मध्ये 30 टक्के  भारतीय असणे , व सिलिकॉन  व्हॅली  मध्ये  30 टक्के भारतीय  असणे हि बाब अभिमानाची असणे बरोबरच  लाजिरवाणी पण आहे असे मत डॉक्टर  अपर्णा ललिंगकर यांनी व्यक्त केले. 

फोरम फॉर  इनोव्हेशन अँड  अप्लिकेशन या संस्थेच्या सभेमध्ये त्या बोलत होत्या होत्या. रविवारी  सावरकर भवन  निगडी प्राधिकरण येथे  हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी  इनोव्हेशन सायकल कशी असते, त्याचे फायदे व दुष्परिणाम, आर्ट ऑफ इनोव्हेशन, त्यासाठी आवश्यक मार्केटिंग स्किल व समाजाभिमुख  इनोव्हेशन या विषयी संकल्पना त्यानी विशद केल्या.

आपल्या भारतातील टॅलेंट हे भारतात राहणे व आपल्या देशासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे असे मत मांडताना त्या पुढे म्हणाल्या कि आपल्या देशातील पालकांनी माझा पाल्य हा परदेशात नोकरी करतो हे अभिमानाने सांगणे बंद केले पाहिजे.

यासाठी त्यांनी इस्रायल या देशाचे उदाहरण देऊन त्या म्हणाल्या कि आकाराने  केरळ एवढा देश असूनही तिथे  शालेय अभ्यासात  इनोव्हेशन चा समावेश आहे. व आज जगातील सर्वात जास्त स्टार्ट अप इस्रायल मध्ये आहेत.

सुधारित नवी धोरणे व सरकारी इच्छाशक्ती याच्या जोरावर भारताचा तिसरा क्रमांक लागतो. कम्युनिकेशन स्किल, क्रिएटिव्ह थिंकिंग, धोरण निश्चिती, सतत मोटिव्हेट रहाणे,  व जोखीम पत्करायला शिकणे या प्रमुख बाबींवर त्यानी आपले विचार मांडले.

डॉक्टर अपर्णा ललिंगकर या अक्षरब्रन्ह या संस्थेच्या संचालिका आहेत, तसेच माहिती तंत्रझान विषयात त्यानी पी. एच. डी. केली आहे. 15 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय  शोधनिबंध त्यानी आजवर  प्रकशित  केले आहेत .

रस्त्यावरील प्रदूषण  हा विषयावर  संशोधन  करणारे सिद्धार्थ  कदम याना फिन्याप  पुरस्काराने  सन्मानित  करण्यात  आले. डॉक्टर  अपर्णा ललिंगकर  यांचे  हस्ते कदम याना  शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन  सन्मानित कारणात आले.

या प्रसंगी  फिन्याप  चे अध्यक्ष  अविनाश देशमुख, चिन्मय  कवी, चंदन  पाटील, व सर्व सभासद  उपस्थित होते. सुत्रसंचलन  सारंग  पापळकर  यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.