Pune News : खडकवासला धरणात कार कोसळून चार महिलांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-पानशेत रस्त्यावर कुरण फाट्याजवळ पानशेतकडून पुण्याकडे निघालेल्या सॅंट्रो कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार थेट खडकवासला धरणात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या घटनेत कारमधील एकाच कुटुंबातील तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार मृतदेह बाहेर काढले आहेत. चालकाला वाचविण्यात यश आले आहे. अल्पना विठ्ठल भीकुले ( वय 4,5 सध्या रा. चव्हाणगर धनकवडी पुणे,) मुली प्राजक्ता (वय 21), प्रणिता (वय 17), वैदेही (वय 8) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत
तर वडिल विठ्ठल केशव भिकुले (वय 46) पोहून वर आल्यामुळे बचावले आहेत.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाने उत्तम कामगिरी करून सर्व मृतदेह बाहेर काढले. ही कामगिरी मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.