Pune: आरोग्य प्रमुख आजारी असल्याने तातडीने अनुभवी अधिकाऱ्यांची नेमणूक करवी- दीपाली धुमाळ 

As the health chief is ill, experienced officers should be appointed immediately - Deepali Dhumal कोवीड सेंटरची उभारणी डॉक्टर भरती ऑक्सिजन व व्हेंटीलेटर उपलब्धता याबाबत यापूर्वीच लेखी पत्रव्यवहार केला आहे.

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे आजारी असल्याने तातडीने या पदावर अनुभवी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी  विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे. यासंदर्भातील पत्र महापौर मुरलीधर मोहोळ आणि आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे. 

कोरोनाचा संसर्ग गेले चार महिने सातत्याने वाढत आहे. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या एक लाखा पर्यंत जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभुमीवर कोवीड सेंटरची उभारणी डॉक्टर भरती ऑक्सिजन व व्हेंटीलेटर उपलब्धता याबाबत यापूर्वीच लेखी पत्रव्यवहार केला आहे. निधीची कमतरता भासल्यास मुख्य सभेच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ, असेही दीपाली धुमाळ यांनी पत्रात म्हटले आहे.

कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेस सध्या आरोग्य प्रमुख नाहीत ही वस्तुस्थिती आहे. सद्यस्थितील आरोग्य प्रमुख तसेच पाच सहाय्यक आरोग्य प्रमुख रात्रंदिवस एकही दिवस सुट्टी न घेता काम करत आहेत. दोन सहाय्यक आरोग्य प्रमुख  व आरोग्य प्रमुख हे पुढील 15 दिवस कामावर हजर राहु शकणार नाहीत. परंतु, पुणे शहराची कोरोना बाबत परिस्थिती पाहता आरोग्य प्रमुख दर्जाचा अधिकारी रजेवर जाताना प्रशासकीय कामकाज पाहता अन्य अधिकारी यांची उपलब्धता यापूर्वी करणे गरजेचे होते, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.