Asaram Bapu Convicted : आसाराम बापूंना अखेर जन्मठेपच!

एमपीसी न्यूज : बलात्कार प्रकरणात गांधीनगरच्या (Asaram Bapu Convicted) सत्र न्यायालयाने आसाराम बापूंना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी न्यायालयाने सोमवारी सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता. या आधी न्यायालयात सरकारी वकिलांनी आपल्या युक्तिवादात आरोपी आसाराम बापूंना जन्मठेपेची मागणी केली होती. तसेच, आरोपी हा सवयीचा गुन्हेगार असून त्याच्याकडून भरघोस दंडही ठोठावण्यात यावा, असेही सांगितले. आसाराम बापू सध्या जोधपूर तुरुंगात शिक्षा भोगत आहे.  

Chinchwad Bye-Election : पोटनिवडणूक अटळ; अजितदादांच्या वक्तव्यामुळे चित्र स्पष्ट

गांधीनगरच्या सत्र न्यायालयाने 2013 मध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूंना दोषी ठरवले होते. अहमदाबादमधील मोटेरा येथील आश्रमात आसाराम बापूंनी 2001 ते 2006 दरम्यान महिला शिष्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.

गांधीनगर सत्र न्यायालयाने सोमवारी आसाराम बापूंविरुद्धचा खटला पूर्ण केला आणि त्यांना आयपीसीच्या कलम 376, 377, 342, 354, 357 आणि 506 अंतर्गत दोषी ठरवले. महिलेच्या बलात्कार प्रकरणात आसाराम यांची पत्नी लक्ष्मीबेन, त्यांची मुलगी आणि इतर चार शिष्यांसह सहा आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.