Cabaret girl Helen बाबत Asha Bhosale म्हणाल्या, ‘मी पुरुष असते ना तर तिला पळवूनच नेलं असतं!’

Asha Bhosle said about 'Cabaret girl' Helen, 'If I were a man, I would have kidnapped her!'

एमपीसी न्यूज – हिंदी चित्रपटसृष्टीत साठच्या दशकातील कॅबरे साँग म्हटलं की, आपल्याला आठवते ती कॅबरेगर्ल हेलन आणि ते गाणं कोणी गायलंय असं म्हटलं की, आठवणार त्या आशा भोसले! आशा भोसले यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी स्वत:चे युट्यूब चॅनेल सुरु केले आहे. त्यावर त्या आपल्या आयुष्यातील अनेक घटना, किस्से, आठवणी शेअर करतात.

अशीच एक गंमत सांगताना त्या पटकन म्हणाल्या की, मी जर पुरुष असते ना तर एका अभिनेत्रीला पळवूनच नेले असते. अहो कोण म्हणजे काय ? हेलनला पळवून नेले असते. हेलन अत्यंत सुंदर होती. बरेचदा माझे गाण्याचे रेकॉर्डिंग सुरु असायचे आणि हेलन यायची. मी आपली गाणं विसरुन तिच्याकडे बघत बसायचे. मी जर पुरुष असते ना तर तिला पळवूनच नेले असते.

हेलन पण माझ्यावर खूप प्रेम करायची. तिचे गाणे असेल तेव्हा रेकॉर्डिंग झाल्यावर मला नेहमी चॉकलेट देत असे. आशा आणि हेलन या जोडीने त्याकाळी धमाल उडवून दिली होती. खरंतर आशा भोसले यांचे अतिशय प्रसिद्ध असे क्लब सॉग म्हणजे ‘आईये मेहरबा’. पण ते चित्रित झाले बॉलिबूडची सौंदर्यदेवता मधुबालावर. मात्र त्याच हावडा ब्रीज या चित्रपटातील असेच एक क्लब सॉग ‘मेरा नाम चिन चिन चू’, ज्यात  हेलनचे नृत्य आहे ते म्हटलं गीता दत्त यांनी.

पुढे मात्र हेलन आणि आशा यांची जोडी घट्ट जमली. आणि ‘पिया तू अब तो आजा’, ‘कर ले प्यार कर ले के दिन है येही’, ‘ओ हसीना जुल्फो वाली’, ‘ये मेरा दिल प्यार का दिवाना’ यासारखी एकापेक्षा एक बेहतरीन कॅबरे सॉंग चित्रपटसृष्टीला मिळाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.