Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यानिमित्त ‘पीएमपीएमएल’कडून 142 जादा बसेसचे नियोजन

एमपीसी न्यूज – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी निमित्त (Ashadhi Wari 2023) प्रस्थान सोहळ्या निमित्त 8 जून (गुरुवार) ते 14 जून (सोमवार) या कालावधीत पुणे शहर उपनगर ते देहु व आळंदी येथे जादा बसेसचे पीएमपीएमएलकडून नियोजन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी दिनांक 8 ते 12 पर्यंत आळंदी करिता स्वारगेट, म.न.पा., हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड या ठिकाणावरून सध्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा प्रतिदिनी एकूण 142 बसेस संचलनात राहणार आहेत. तसेच रविवारी (दि.11) रात्रौ बारा वाजेपर्यंतपर्यंत आळंदीकरिता बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

याशिवाय देहूकरिता पुणे स्टेशन, म.न.पा., निगडी, या ठिकाणावरून सध्याच्या संचलनात असणाऱ्या बसेस व जादा बसेस अशा एकुण 30 बसेस महामंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय देहू ते आळंदी अशा 12 बसेस ठेवण्यात आलेल्या आहेत.

तर 12 जून रोजी पालखी प्रस्थान आळंदीमधून होत असल्यामुळे पहाटे अडीचपासून स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, म.न.पा. या ठिकाणावरून (Ashadhi Wari 2023) आळंदीला जाण्यासाठी जादा 18 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

या व्यतिरिक्त नेहमीच्या संचलनात असणाऱ्या बसेस सकाळी साडे पाच वाजल्यापासून पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील बस स्थानकावरून नेहमीच्या मार्गावरील 113 बसेस आळंदीसाठी भोसरी व विश्रांतवाडी पर्यंत भाविकांच्या सेवेसाठी संचलनात राहणार आहेत. याशिवाय जादा बसेसची व्यवस्था ही प्रवाशांच्या गरजेनुसार (प्रवासी संख्या किमान 40 आवश्यक) देण्यात येईल.

Khed : रुग्णवाहिका आणि टेम्पोची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, तिघेजण जखमी

तसेच पुण्याहून पालख्या प्रस्थानाच्या वेळेस 14 जून रोजी हडपसरमध्ये पालख्या दर्शनासाठी दुपारी 12 ते 1 दरम्यान थांबणार असल्याने अशा वेळेस महात्मा गांधी स्थानक येथून पुणे स्टेशन, वारजेमाळवाडी, कोथरूड डेपो, निगडी, चिंचवड, आळंदी इ. ठिकाणी जाण्यासाठी बससेवा देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच कात्रज कोंढव्याकडे जाण्यासाठी शिवरकर गार्डन येथून आणि मुंढवा, चंदननगर व वाघोलीसाठी मगरपट्टा येथून बस सेवा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळा सोलापूर व सासवड रोडने मार्गस्थ होईल. अशा वेळी सोलापूर/उरूळीकांचन मार्ग जसा जसा वाहतुकीसाठी खुला होईल तसतशी बस वाहतूक चालू ठेवण्यात येईल. हडपसर ते सासवड दरम्यानचा दिवेघाट हा रस्ता वाहतुकीस पुर्णत: बंद राहणार आहे. तसेच प्रवासी/भाविकांच्या वाहतुकीच्या सोईसाठी म्हणून सदर मार्गांची बस वाहतूक पर्यायी मार्गाने म्हणजेच दिवेघाट ऐवजी बोपदेव घाट मार्गे अशी चालू ठेवण्यात येणार असून सदर बसेसचे संचलन स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर असे राहणार असून अशा 60 जादा बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.

तरी या बस वाहतुकीबाबतची नोंद सर्व संबंधित भाविक व इतर प्रवासी नागरिकांनी घेऊन त्याचा लाभ घ्यावा आणि सहकार्य करावे असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.