Ashadhi Wari : आषाढीवारी काळात विविध सुविधांसाठी कंट्रोल रूम उभारणार – गोविंद शिंदे

एमपीसी न्यूज –  आळंदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी (Ashadhi Wari) पालखी सोहळ्याच्या नियोजनाकरिता उपविभागीय आधिकारी  गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय आधिकारी, देवस्थान यांची बैठक आळंदी नगरपरिषदेत आयोजित करण्यात आली होती.

यावेळी डी डी भोसले पाटील यांनी आरोग्य विभाग, अतिक्रमण, वाहनतळ, पाणी सुविधा, जुन्या इमारती संदर्भात माहिती देत, सूचना मांडत नदी पलीकडील वारी (Ashadhi Wari) काळातील महत्वपूर्ण असलेला रस्ता रुंदीकरण का होत नाही, कधी होणार, असे अनेक  प्रश्न संबंधित विषयावर उपस्थित केले.

Pune : दक्षिण कमांडद्वारे सदर्न स्टार आर्मी -शिक्षण, उद्योग सन्मुखता कार्यक्रमाचे आयोजन

ते म्हणाले की, अतिक्रमणाबाबत तात्पुरती कारवाई नको, कायमस्वरूपाची असावी. पोलीस प्रशासनास वारी काळात (Ashadhi Wari) राहण्याची सुविधा व  योग्य त्या त्यांना सुविधा मिळाव्यात. दर्शनबारी जागा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा. वाहतूक विभागाच्या कारवाईसाठी क्रेन सुविधा व संबंधित कारवाई करण्यात आलेल्या गाड्या उचलून नेण्यासाठी वाहन व्यवस्था  पालिका प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात.साखळी उपोषणा वेळी प्रांत यांनी दिलेल्या पत्राप्रमाणे जलप्रदूषणा बाबतची बैठक लवकर आयोजित करण्यात यावी.

फूटपाथवर अतिक्रमण नको – प्रेरणा कट्टे

सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी वारीकाळात फुटपाथ वर अतिक्रमण होऊ नये याबाबत सूचना मांडल्या. वारी काळात जे पासचा गैरवापर करत असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
वाहतूक विभागाचे शहाजी पवार यांनी देहूफाटा येथील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी तेथील विद्युत खांबाचे स्थलांतर करावे, अशी मागणी केली. वारी काळात वाहतुकीस अडसर ठरणाऱ्या वाहनांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. देहूफाटा व चाकण चौक येथे सिग्नल बसवावेत. यासाठी पालिकेत अर्ज केल्याची माहिती दिली. अतिरिक्त बॅरिगेट्स ही त्यांनी मागणी यावेळी केली आहे.

ग्रामीण रुग्णालय अधिकक्षक उर्मिला शिंदे यांनी ग्रामीण रुग्णालयात मनुष्य बळ कमी असल्याने तिथे रुग्णालयात कर्मचारी वाढवावेत,तसेच वारी काळात तिथे स्वच्छता विभागाचे कर्मचारी वाढवावेत अशी मागणी यावेळी त्यांनी केली. पोलीस प्रशासनाने नदीपलीकडील  दर्शनबारी  संदर्भातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या.

दर्शनबारीसाठी जागा लवकर ताब्यात मिळावी 

त्यावर विश्वस्त अ‍ॅड विकास ढगे पाटील म्हणाले की, त्यावेळी दर्शनमंडप बांधण्याकरिता कमी दिवस कमी वेळ मिळाल्याने  तिथे त्या समस्या निर्माण झाल्या. दर्शनमंडप उभारण्यासाठी तेथील जागा लवकरात लवकर ताब्यात मिळावी यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत.

मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी स्वच्छता गृह, आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, वैद्यकीय विभाग, विद्युत पुरवठा, वाहनतळ व वारी काळात (Ashadhi Wari) इतर आवश्यक असणाऱ्या बाबी या विषयी येथे माहिती दिली. तसेच सी सी टी व्ही सुविधे बाबत माहिती यावेळी स्पष्ट केली.

उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी विविध (पोलिस,पालिका, विद्युत विभाग इतर) सुविधांसाठी एकच कंट्रोल रूम ची स्थापना केली जाईल.वारी संदर्भातील असलेले योग्य ते पत्रव्यवहार केले आहेत. वारी संदर्भातील पूर्व आढावा ,सूचना याबाबत त्यांनी माहिती यावेळी दिली.

पाणीपुरवठा सुरळीत ठेवा

एम डी पाखरे यांनी भामाआसखेड येथील पाणीपुरवठा वारी काळात विस्कळीत होऊ नये, यासाठी संबंधित आधिकारी कर्मचारी वर्गाला पूर्व सूचना द्याव्यात. तसेच वडगांव रस्त्यावरील वाहनतळ भाविकांना उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी त्या संबंधित प्रश्न उपस्थित केला.

शंकर कुऱ्हाडे यांनी  पास असून मंदिरात जाण्यास अडवणूक होते अशी तक्रार मांडली. तसेच नेत्यां बरोबर मंदिरात दोन ते तीनच (कमी) व्यक्ती सोडाव्यात, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.आळंदी जनहित फाउंडेशनच्या वतीने निवेदन सूचना पत्र देण्यात आले.बैठक संपन्न झाल्यानंतर प्रांत आधिकारी यांनी दर्शनबारी स्थळाच्या जागेची पाहणी केली.

यावेळी बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब पवार व विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.