Ashok Chavan : काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर ; आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा

एमपीसी न्यूज – राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा  खळबळ उडण्याची (  Ashok Chavan) शक्यता आहे.  काँग्रेसचे दिग्गज नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची चर्चा सुरु असून ते  भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सध्या त्यांचा  फोन नॉट रीचेबल आहे .

Magh : ओळख मराठी महिन्यांची – भाग 11– वैविध्याने नटलेला माघ महिना

अशोक चव्हाण यांच्यासोबत 11आमदारदेखील भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अशोक चव्हाण यांना भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर असल्याचं देखील कळतंय. अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवल जात आहे.अशोक चव्हाण यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानंतर या बातम्या समोर (  Ashok Chavan) आल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.