Pune : हिंदू – मुस्लिम, दलित, मागासवर्गीय या सर्वांना सोबत घेऊन जाणारा काँग्रेस पक्ष – अशोक चव्हाण

एमपीसी न्यूज – भाजपने देशात ‘एनआरसी’ व ‘सीएए’ च्या माध्यमातून जाती धर्मात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये काँग्रेस पक्ष मुस्लिम धर्माची बाजू घेत आहे, असे चित्र निर्माण करीत आहे. परंतु, काँग्रेस हा पक्ष हिंदू – मुस्लिम, दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे काम करीत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने अशोक चव्हाण यांचा काँग्रेस भवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दीप्ती चवधरी, रोहित टिळक, संजय बालगुडे, काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे, नीता रजपूत, अमीर शेख, कमल व्यवहारे, दत्तात्रय बहिरट, कैलास कदम, सुजित यादव, भुजंग लव्हे, नगरसेवक अविनाश बागवे, रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, चंदू कदम उपस्थित होते.

अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेत व विधानसभेत काम केले. येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी प्रामाणिकपणे काम करून पक्षाची ताकद वाढविणे गरजेचे आहे. शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितल्याप्रमाणे प्रामाणिक कार्यकर्त्याला महामंडळ व समित्यांमध्ये सामावून घेण्याचे काम मी नक्कीच करणार आहे. तसेच, 5 वर्षांत काँग्रेसच्या कार्यकर्त्याला सरकारी यंत्रणेकडून जो काही त्रास झाला, याची जाणीव देखील मला आहे. त्यामुळे मी आज तुम्हाला हे नक्की सांगेन काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या केसालाही यापुढे धक्का लागू देणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.