Pimpri News : आयुक्तसाहेब केवळ वॉल पेंटिंगवर स्मार्ट सिटी आकार घेतेय – अशोक मंगल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात केवळ वॉल पेंटिंगवर स्मार्ट सिटी आकार घेताना दिसत आहे. शहरातील अनेक ठिकाणचे पदपथ, सार्वजनिक ठिकाणे नागरिक वापरू शकत नाहीत. कारण, सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपी बसलेले असतात. आयुक्तसाहेब याला स्मार्ट सिटी म्हणत नाहीत. आपण लक्ष घालून यामध्ये तातडीने सुधारणा करावी अशी मागणी जागरुक नागरीक मंचांचे संयोजक अशोक मंगल यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे सीईओ राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात मंगल यांनी म्हटले आहे की, मध्य स्थानकांवर टिकेक्ट विंडो नसताना मेट्रोचे उद्घाटन झाले. लोक काहीच करू शकत नाहीत. त्यांनी तशाच प्रवास करावा का, ही आपली स्मार्ट सिटी आहे का? ऑटोक्लस्टर रोडवर, आयुक्त बंगल्यासमोर रस्ता बनवला आहे. पण, तो वापरात नाही. कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आधी सोडविता आला असता. त्यानंतरच जनतेचा पैसा कामांवर खर्च करायला हवा होता.

अनेक सार्वजनिक ठिकाणी जसे की पादचारी रस्ता पूल ओलांडणे नागरिकांना कठीण झाले आहे. कारण, मद्यपी बसलेले असतात. खुलेआम ड्रग्ज वापरतात. त्यामुळे लोक या सुविधा वापरण्यास घाबरतात. पुन्हा सार्वजनिक निधी खर्च केला जातो आणि सुविधा वापराच्या अडथळ्याकडे दुर्लक्ष केले जाते. हे स्मार्ट सिटीचे वैशिष्ट्य नक्कीच नाही.

ऑटोक्लस्टर रोडवर सुसंस्कृत नागरिक फूटपाथ वापरू शकत नाहीत. कारण संध्याकाळी तरुण जोडप्यांनी खुलेआम कब्जा केलेला असतो. ऑटो क्लस्टर रोडवर बीआरटी क्वचितच धावत असते. बस स्टँडवर नियुक्त केलेल्या लोकांकडे कोणतेही काम नसते आणि तरीही ते निष्क्रिय आणि नुसते बसून पगार घेतात. हा पुन्हा सार्वजनिक निधीचा अपव्यय आहे.

अनेक न वापरलेली, टाकून दिलेली व भंगार वाहने शहरभर दिसत आहेत. ती वाहने काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जात नाहीत. उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतरही कारवाई होती नाही. अजमेरा कॉलनीत एका बँकेने जप्त केलेली वाहने अनेक वर्षांपासून अरुंद रस्त्यावर उभी आहेत. अशा विविध समस्या, प्रश्न आहेत. याकडे आपण लक्ष देऊन त्या मार्गी लावाव्यात अशी मागणी मंगल यांनी निवेदनातून केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.