Vadgaon Maval : कान्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक सातकर

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कान्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक आनंदराव सातकर यांची तर व्हाईस चेअरमनपदी प्रदीप शिवाजी मोहीते यांची निवड झाली.

यावेळी सोसायटीचे संचालक बंडोबा सातकर,सुदाम आगळमे, प्रदीप ओव्हाळ, दशरथ सातकर, किशोर सातकर, नंदाताई सातकर, दत्ता शिंदे, विलास जांभुळकर, एकनाथ येवले, मंदाताई गाडे यांच्यासह अंकुश आंबेकर, सदानंद सातकर, गोरख आगळमे, दत्तात्रय निम्हण, अभिजित सातकर, योगेश गाडे, रुपेश खाणेकर, अमोल बोहऱ्हाडे, शंकर मोहिते,सखाराम सातकर, वैभव नवघणे आदी उपस्थित होते.

सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणूक प्रक्रियेचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.जे. तळपे यांनी तर सहाय्यक म्हणून सचिव गणपत भानुसघरे यांनी काम पाहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.