Pune : प्रबळ इच्छाशक्तीमुळे कर्करोगासारख्या दूर्धर आजारावर मात – अश्विनी अकोलकर

शतायुषी मी होणार पुस्तकाचे प्रकाशन

एमपीसी न्यूज – मृत्यूच्या दाढेतून परतण्यासाठी केवळ तीव्र इच्छाशक्तीच आवश्यक असते. गुडघ्याचा हाडाचा कर्करोग त्यानंतर फुफ्फुसाचे सलग चार कर्करोगाची शस्त्रक्रिया झाल्यावर पुन्हा सर्वसाधारण जगताना केवळ तीव्र इच्छाशक्तीच असते. माझ्या लढाईतून इतरांना जगण्याची प्रेरणा मिळावी याच उद्देशाने हे पुस्तक लिहिण्याचे काम केले, असे मत अश्विनी अकोलकर यांनी केले.

येथील नाना नानी पार्क सभागृहात   रविवार (दि.१९) सायंकाळी ६ वा. होय! मी शातयुष होणार ! या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी डॉ. योगेश पंचवाघ, डॉ. संजय देशमुख, डॉ. मिनिष जैन, प्रा. दीपक गंगोळी, सामाजिक कार्यकर्ते अमरदीप पंढरीनाथ मखामले, प्रा. शिरीष अवधानी, रघुनाथ अकोलकर, मंदा अकोलकर, अमोल अकोलकर, किरण अकोलकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे  सदस्य,  लायन्स क्लब हस्य योगा सदस्य व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

अकोलकर पुढे म्हणाल्या कर्करोग झाल्यावर मानसिकता पाॅझिटिव्ह  राहणे आवश्यक आहे. माझ्या आयुष्यात २०१४ ते सप्टेंबर २०१९ पर्यंतचा काळ कर्करोगाशी झूंज देणारा ठरला. या काळात आई – वडील व दोन भाऊ यांचा  खूपच भावनिक आधार मिळाला. कर्करोगात शरीरावर होणारे बदलच नकारात्मक विचार मनात आणतात. तो खरा काळ असतो, लढण्याची जिद्द, इच्छाशक्ती व आत्मविश्वास  हे आवश्यक आहे. मी स्वतःच्या अनुभवातून लिहिलेले पुस्तक विकून कर्करोग रुग्णांना मदत करणार आहे.

अश्विनी अकोलकर यांच्या लढण्याची जिद्द कळल्यावर शेजारी गहिवरले. तिचे पुस्तक घेऊन वाचण्यासाठी मावळ तालुक्यातील वाचक गर्दी करत आहे. सामाजिक कार्यकर्ते अमरदीप मखामले म्हणाले अश्विनी अकोलकर हिच्या संघर्षातून खरचं जगण्याची जिद्द मिळते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक केसकर यांनी केले. सूत्रसंचालन किरण अकोलकर यांनी केले. आभार अमोल अकोलकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.