Asia Cup Cancelled: आशिया चषक रद्द, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची माहिती

Asia Cup canceled, BCCI President Sourav Ganguly informed भारतीय संघ मैदानात कधी पुनरागमन करणार याबद्दल काही सांगता येत नाही. भारत आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना कधी खेळेल हे सांगणं जरा कठीण आहे.

एमपीसी न्यूज- यंदाच्या आशिया चषकाचं आयोजन रद्द करण्यात आल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये विक्रांत गुप्ता यांच्याशी बोलताना दिली.

मात्र, आशियाई क्रिकेट परिषद किंवा पाक क्रिकेट बोर्डाकडून याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

विक्रम गुप्ता यांच्याशी चर्चा करताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, भारतीय संघ मैदानात कधी पुनरागमन करणार याबद्दल काही सांगता येत नाही. भारत आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना कधी खेळेल हे सांगणं जरा कठीण आहे.

आम्ही सर्व तयारी केली आहे. पण जोपर्यंत सरकार नियम स्पष्ट करत नाही तोपर्यंत काहीही बोलणं योग्य ठरणार नाही. प्रत्येक खेळाडूचे आरोग्य महत्वाचे आहे त्यामुळे आम्हाला सध्या कोणतीही घाई नाही.


आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित करण्यासाठी बीसीसीआयने पाक क्रिकेट बोर्डाला पीएसएल’चं आयोजन पुढे ढकलून त्या जागेवर आशिया चषक खेळवण्याची विनंती केली होती. ज्याला पाक क्रिकेट बोर्डाने नकार दिला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.